Friday, July 5, 2024

जेव्हा शूटिंगदरम्यान प्रसंगावधान दाखवत अमिताभ यांनी वाचवला होता एका मुलीचा जीव, वाचा ‘तो’ किस्सा

‘महानायक’ अमिताभ बच्चन केवळ एक हुशार कलाकारच नाहीत, तर एक उत्तम व्यक्ती देखील आहेत. अमिताभ यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि शक्तिशाली आवाजाची जादू ही आहे की, ते प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णतः झोकून  देतात. त्यांचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. सोशल मीडियावरून ते आपल्या चाहत्यांशी कायमच संपर्कात असतात.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात अमिताभ यांच्यासमवेत उत्पल दत्त, मधु आणि जलाल आगासारखे दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट यशस्वी झाला नव्हता, परंतु पहिल्याच चित्रपटासाठी अमिताभ यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट आणि शूटिंगशी संबंधित बरेच रंजक किस्से आहेत, पण एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी प्रसंगावधान दाखवत एका मुलीचे आयुष्य वाचवले होते.

माध्यमांच्या माहितीनुसार, ‘जादूगार’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जादूगार बनलेल्या अमिताभ यांना जादू दाखवायची होती. सेटवरील सर्व तयारी पूर्ण झाली होती. नसीम खान नावाची महिला बालकलाकाराला एका बॉक्समध्ये बंद केले होते. शूटिंग सुरू झाले, शूट झाल्यानंतर चित्रपट क्रूने पुढच्या शॉटची तयारी सुरू केली होती. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाले होते. कोणाच्याही डोक्यात नसीमबद्दल विचार आला नाही.

दरम्यान, अचानक अमिताभ यांना आठवले की, नसीमला बॉक्समधून काढलेच नाही. पळत पळत गेले असता, त्यांनी बॉक्स उघडला, आणि समजले की, नसीम बेशुद्ध पडली होती. तिला त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले, आणि त्यामुळे तिचा जीव वाचला होता. अशा प्रकारे, अमिताभ यांनी कनिष्ठ कलाकारांचे प्राण वाचवले, आणि आपली जादू दाखविली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

व्यायाम तर केलाच पाहिजे! अमिताभ यांच्यापासून ते करीनापर्यंत ‘या’ कलाकारांनी घरातच बनवलीये जिम

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

हे देखील वाचा