Friday, July 5, 2024

‘या’ कलाकारांनी लपवून ठेवले होते आपले अफेअर, सत्य समोर आल्यावर सर्वांनाच बसला होता धक्का

बॉलिवूडमध्ये प्रेम, नातेसंबंध आणि डेटिंगचे अनेक किस्से आहेत. बॉलिवूडमधील संबंध अनेकदा गुप्त ठेवले जातात. यामागे अनेक कारणे असू शकतात. पण लपवून ठेवलेले संबंध हे कधी ना कधी सर्वांसमोर येतातच. राज कपूरच्या काळापासून ते अर्जुन कपूरपर्यंत, बॉलिवूडमध्ये अशी अनेक नाती आहेत. त्यांच्या या संबंधाची जेव्हा जगाला माहिती झाली, तेव्हा सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या नात्याबद्दल इतक्या अफवा पसरल्या होत्या की, जेव्हा त्या खऱ्या ठरल्या तेव्हा कुणाचाच विश्वास बसत नाही. परंतु हे सर्व संबंध बाहेर आले आणि संपूर्ण जगाला कळले. तर काहींनी प्रेमाची उघडपणे कबूल दिली. त्यानंतर अनेक रिलेशनशिप एका वाईट टप्प्यावर पोहोचले आणि मग ते जगासमोर आले. बॉलिवूडच्या अशाच काही प्रेमाने भरलेल्या कथांबद्दल जाणून घेऊया, जी उघड झाल्यानंतर बॉलिवूडपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता.

राज कपूर- नर्गिस
एकेकाळी बॉलिवूडचे सुपरस्टार राज कपूर हे नर्गिस यांच्या सोबत रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा राज कपूर नर्गिसच्या प्रेमात पडले, तेव्हा ते आधीच विवाहित होते. त्यांनी कृष्णा कपूरसोबत लग्न केले होते. राज कपूर आणि नर्गिस या दोघांनी एकत्र १६ चित्रपट केले. ऑन-स्क्रीनचे हे प्रेम ऑफ-स्क्रीनही वाढू लागले. पण असे म्हटले जाते की, राज कपूर यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडण्यास नकार दिला आणि त्यानंतर नर्गिस यांची सुनील दत्त यांच्याशी भेट झाली. अशा प्रकारे राज कपूर आणि नर्गिस यांच्यातील संबंध कायमचे संपले.

राणी मुखर्जी- आदित्य चोप्रा
अभिनेत्री राणी मुखर्जीचे नाव तिच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांशी जोडले गेले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाही वाटले नव्हते की, ती निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राशी लग्न करेल. लग्नापूर्वी दोघांनीही हे नाते कधीच स्वीकारले नाही किंवा नाकारले नाही. आदित्यने त्याची बालपणीची मैत्रीण पायल खन्नाशी लग्न केले होते. मात्र जेव्हा तो राणीच्या प्रेमात पडला. तेव्हा त्याने जुने नाते तोडले आणि या नात्याची खात्री तेव्हाच झाली जेव्हा दोघांचे लग्न झाले.

उदय चोप्रा- नर्गिस फाखरी
अभिनेत्री नर्गिस फाखरीने ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु आता ती जास्त चित्रपटात दिसत नाही. नर्गिस पाच वर्षांपासून उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती म्हणाली की, “या काळात लोक तिला याबद्दल न बोलण्यास सांगत असत.” त्यांच्या नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या, पण या दोघांनीही त्याचा स्वीकार केला नाही. नेहमी चांगले मित्र म्हणत विषय टाळत राहिले. परंतु आता दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. परंतु इतक्या वर्षांनी, जेव्हा त्यांच्या नात्याची गोष्ट बाहेर आली, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले.

विक्रम भट्ट- सुष्मिता सेन
बॉलिवूडमध्ये आपल्या हॉरर चित्रपटांमुळे चर्चेत असलेले विक्रम भट्ट हे एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. मात्र जेव्हा त्यांच्या आणि सुष्मिता सेनच्या नात्याची बातमी माध्यमांमध्ये आली, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. विक्रमने स्वतः मान्य केल्यावर सर्वांना याची माहिती झाली. विक्रम म्हणाले होते की, जेव्हा ते घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होते, तेव्हा ते विवाहबाह्य संबंधात होते. हे नाते फार काळ टिकले नाही पण त्यांची चर्चा खूप झाली.

मलायका अरोरा- अर्जुन कपूर
आज अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल बॉलिवूडमध्ये सर्वत्र चर्चा आहे. सुरुवातीला जेव्हा त्यांच्या डेटिंगची बातमी बाहेर आली, तेव्हा कोणीही यावर विश्वास ठेवला नाही. मलायका ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी आहे आणि खान कुटुंबातून आहे. तिचे अर्जुन कपूरसोबत अफेअर आहे, ते कोणीही पचवू शकत नाही.

मात्र जेव्हा अरबाज आणि मलायकाचा घटस्फोट झाला, तेव्हा हे सर्व स्पष्ट होऊ लागले. यानंतर, हळूहळू मलायका आणि अर्जुन एकत्र दिसू लागले आणि त्यांनी उघडपणे त्यांचे नाते स्वीकारले. आज दोघेही आनंदी जोडपे आहेत आणि अनेकदा मुंबईत अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा