Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण केले आहे. उर्वशी ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने बोल्डनेस आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचबरोबर तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मनोरंजन केले आहे. उर्वशी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. त्याचबरोबर ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओमध्ये ती एका निराळ्या आउटफिटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमुळे ती ट्रोल्सच्या निशाण्याखाली आली आहे. मात्र काहीजण तिची स्तुती देखील करत आहेत.

उर्वशी रौतेलाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, ती या खास आउटफिटमध्ये फोटोशूटसाठी पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी सिल्व्हर कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये दिसत आहे. ड्रेसला बाहीच्या जागी पंख लावले आहेत. त्यावर तिने शाही दागिने देखील घातले आहेत. त्याचबरोबर तिने डोळ्यांवर जाडसर काजळ देखील लावले आहे. या दोन्ही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने वेगवेगळे प्रेरणा देणारे कोट लिहिले आहेत. तिने घातलेल्या कपड्यांचा ब्रँड टॅग देखील केला आहे, जो अशा पोशाख बनवतो.

उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. काही चाहत्यांनी तर फायर इमोजीने प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे. त्याचबरोबर एका युजरने लिहिले की, “कोणी इतके सुंदर कसे असू शकते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “उर्वशीच्या सौंदर्यावर जळणाऱ्यानो बाजूला सरका.” इतकेच नव्हे तर काही युजर्सने तिला ट्रोल देखील केले आहे. एका युजरने उर्वशीच्या ड्रेसला ‘फनी’ म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने त्याला ‘रावणाचा पोशाख’ म्हटले आहे. उर्वशीच्या या ड्रेसमध्ये बाहीऐवजी पंख पाहून एका युजरने तिला ‘पक्षीराज’ म्हटले आहे.

खरं तर उर्वशी खूप फॅशनेबल आहे. ती सार्वजनिक ठिकाणी जाताना नेहमीच तिच्या लुक्सने तिच्या अदाकारीने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि वर्कआउट देखील करत असते. त्याचबरोबर ती फिटनेस फ्रिक देखील आहे. उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘व्हर्जिन भानुप्रिया’ मध्ये दिसली होती. त्याचबरोबर ती लवकरच ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटातून तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा