कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणादरम्यान, या आठवड्यात चित्रपट जगतातून एक चांगली बातमी समोर येत आहे. पवन कल्याणच्या ‘वकील साब’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. फिल्म ट्रेड ऍनालिस्ट, तरण आदर्श यांनी ‘वकिल साब’च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीची अपडेट शेअर केली आहे.
आदर्श म्हणाले की, साऊथच्या चित्रपटाने पुन्हा एकदा कमाईच्या बाबतीत स्वत: ला स्थापित केले आहे आणि सिनेमा कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.
त्यांनी ट्वीट केले की, “दक्षिण चित्रपटांनी पुन्हा एकदा आपली शक्ती दाखविली. पवन कल्याणचा तेलुगु चित्रपट ‘वकील साब’ ने बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटविला आहे.”
⭐ #VakeelSaab – #Australia… Debuts at No 7 position… Fri A$ 147,571 [₹ 84.07 lakhs] / 55 locations.
⭐ #VakeelSaab – #NewZealand… Debuts at No 7 position… Fri NZ$ 10,667 [₹ 5.61 lakhs] / 13 locations.@comScore pic.twitter.com/at4AvMh5A1— taran adarsh (@taran_adarsh) April 10, 2021
दिग्दर्शक श्रीराम वेणूच्या ‘वकील साब’ ने त्याच्या ओपनिंगमध्येच तब्बल 40 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे. उल्लेखनीय आहे की, या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. पवन कल्याणचा कमबॅक चित्रपट म्हणून चाहते या चित्रपटाकडे पाहत आहेत.
जगभरात तब्बल 2000 स्क्रीनवर रिलीझ झालेल्या पवन कल्याणच्या या चित्रपटाने, विशेषतः आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सर्वाधिक स्क्रीन्सवर धमाल केली आहे. हा चित्रपट तेलुगु भाषेत असल्याने, या राज्यातील स्थानिक लोकांनी चित्रपटाला खूप पसंती दर्शविली आहे. कोरोना व्हायरसमुळे स्वत: ला चित्रपटगृहांपासून दूर करणारे प्रेक्षक, आता आपल्या आवडत्या कलाकारांला पडद्यावर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ
-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज