Wednesday, June 26, 2024

एकदम फिट! वरुण धवनने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ, अभिनेत्री इलियाना डिक्रूज म्हणाली, ‘मित्रा तुला…’

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे वरून धवन. आपल्या उत्त्तम अभिनयाने त्याने आपले नाव कमावले आहे. वरुण धवन आपल्या उत्तम अभिनय आणि फिटनेसमुळे चर्चेत आहे. आजकाल वरुण धवन आपल्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसत आहे.

वरुण धवनने बुधवारी रात्री उशिरा आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता वरुण धवन वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, ‘मिस्टर बूमबस्टिक-फ्लो.’ हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूपच पसंत केला जात आहे, या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

त्याबरोबरच बॉलिवूडचे अनेक कलाकार या व्हिडिओवर कमेंट करून, आपली प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री इलियाना डिक्रूजने या व्हिडिओवर  लिहिले की, ‘मित्रा, तुला आपल्या व्यायामासाठी चांगल्या योगासन मॅटची गरज आहे.’ तसेच अपारशक्ती खुराना, दिया मिर्झा, अमायरा दस्तूर, सोफी चौधरी, पवन राव यांनीही फायर इमोजी कमेंट केले आहेत.

अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ चित्रपटात अभिनेता खेत्रपाल या सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. क्रिती सेनन आणि अभिषेक बॅनर्जीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

अलीकडेच वरुणने आपल्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना अनेक रहस्ये खुली केली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर केली, आणि सांगितले की, ‘हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी खूप चिंताग्रस्त होतो. या चित्रपटाच्या अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि एकता कपूर यांनी मला फोनवर अनेकदा समजावून सांगितले होते.’

या चित्रपटात वरुण धवन अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय अनिल कपूर आणि नीतू कपूर यांचाही या चित्रपटात सहभाग आहे. याशिवाय तो शशांक खैतान यांच्या ‘रणभूमि’ या चित्रपटातही दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा