Monday, August 4, 2025
Home अन्य मनाला चटका लावून जाणारी एक्झिट!! प्रसिद्ध विनोदवीर तामिळ अभिनेत्याचे निधन; चाहत्यांना मोठा धक्का

मनाला चटका लावून जाणारी एक्झिट!! प्रसिद्ध विनोदवीर तामिळ अभिनेत्याचे निधन; चाहत्यांना मोठा धक्का

चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत ​​आहे. तामिळ चित्रपट अभिनेता विवेक यांचे चेन्नईतील रुग्णालयात वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. १७ एप्रिल रोजी सकाळी ४.४५ वाजता त्यांनी जगाला निरोप दिला आहे. मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणजेच, १६ एप्रिल रोजी विवेकला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डॉक्टरांकडून इसीएमओ (ECMO) उपचार मिळत होते.

https://www.instagram.com/p/CMW5gFJDGCy/?utm_source=ig_web_copy_link

विवेक त्यांच्या संपूर्ण उपचारादरम्यान आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. अभिनेत्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबात, चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. विवेकच्या निधनानंतर प्रत्येकजण सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहे. चाहत्यांसोबत कलाकारही ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच या कठीण काळात विवेकच्या कुटुंबीयांना धैर्य देण्याची प्रार्थनाही करत आहेत.

विवेकने अलीकडेच १५ एप्रिल रोजी, कोविड लसचा पहिला डोस घेतला होता. यासह, सर्वांनी लस टोचवून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. अशा परिस्थितीत, ही लस घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अभिनेत्याची तब्येत बिघडली ही चिंतेची बाब आहे. तथापि, या क्षणी असे म्हणता येणार नाही की, हा लस किंवा इतर काही गोष्टींचा दुष्परिणाम आहे.

https://www.instagram.com/p/CJu5Tprh4tE/?utm_source=ig_web_copy_link

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, विवेक यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अँजिओप्लास्टीनंतर त्यांचे आपत्कालीन कोरोनरी एंजियोग्राम केले. गुरुवारी (१५ एप्रिल) विवेकने कोरोनाची लस घेतली होती.

विशेष म्हणजे, विवेक हे तमिळ चित्रपटांमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. विवेक खास करून त्यांच्या विनोदी पात्रांसाठी ओळखले जातात. विवेक प्रामुख्याने ‘रन’, ‘पार्थिवान कनवू’, ‘अन्नियन’, ‘शिवाजी’ अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखले जातात.

हे देखील वाचा