करीना कपूर खान बॉलिवूडच्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती तिच्या सौंदर्यामुळे आणि आनंदी स्वभावामुळे कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिची चित्रपट कारकीर्द खूपच चांगली राहिली आहे आणि ती कौटुंबिक जीवनातही चांगली कामगिरी करत आहे. तसेच, करीना प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या अनेक चित्रपटात दिसली आहे.
एकदा जेव्हा करीना ‘गोलमाल ३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गायन रियॅलिटी शोमध्ये पोहोचली होती, तेव्हा शोच्या अँकरने एका व्हीलचेयरवर बसलेल्या वयस्कर व्यक्तीला स्टेजवर आणले. असे म्हटले जाते की, ते करीना कपूरचे आजोबा राज कपूर यांचे सहकारी रामप्रसाद गोयंका होते, ज्यांनी लहानपणी करीनाला आपल्या मांडीवर खेळवले होते.
माध्यमातील वृत्तानुसार, रामप्रसाद गोयंका चित्रपट ‘आग’ ते ‘सत्यम शिवम सुंदरम’ पर्यंत राज कपूरसोबत तंत्रज्ञ म्हणून सोबत असायचे. रामप्रसाद तेव्हा अत्यंत गरिबीत आपले जीवन जगत होते. त्या गायन रियॅलिटी शोच्या माध्यमातून, रामप्रसादला करीनाच्या हाताने आठ लाखांचा धनादेश देण्यात आला.
करीना कपूरने रामप्रसादला अत्यंत भावुक होऊन धनादेशाने चेक दिला. रामप्रसादला ८ लाख रुपयांचा चेक मिळताच, ते आपल्या व्हीलचेयरवरुन उठले आणि नाचू लागले. हे पाहून करीनासह अजय देवगणही चकित झाला. नाचता नाचता रामप्रसादने चेहऱ्यावरून मेकअप काढून टाकला आणि तो प्रसिद्ध कॉमेडियन व्रजेश हीरजी निघाला.
व्रजेशला पाहून करीना त्याला मारण्यासाठी, त्याच्या मागे पळाली. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने तिला थांबवले आणि सर्वांसमोर करीनाची माफी मागितली. त्याने सांगितले की, हे फक्त एक प्रँक आहे. करीनाने रोहितला माफ केले आणि म्हणाली, “बरं झालं मी व्रजेशच्या पाया नाही पडले, कारण धनादेश दिल्यानंतर मी ते करणारच होते.” हा मजेदार एपिसोड प्रेक्षकांनीही खूप एंजॉय केला होता.
अलीकडेच करीना कपूरने तिच्या दुसर्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये मोठा भाऊ तैमूर अली खान आणि वडील सैफ अली खान, आपल्या लहान मुलाला खायला घालताना दिसले. पण करीनाने अद्याप आपल्या लहान मुलाचा चेहरा दाखवलेला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्विटरनंतर आता कंगनाने साधला इंस्टाग्रामवर निशाणा, म्हणाली ‘२०२४ निवडणुकीत भाजपला धोका’
-‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट