Friday, July 5, 2024

झरीन खान ‘बिग बॉस’च्या ‘या’ माजी स्पर्धकाला करतेय डेट; बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री झरीन खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्यातील सर्व गोष्टी उघडपणे सांगत नाही. झरीनने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे सर्वं श्रेय बाॅलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान खानला दिले जाते. त्यानेच झरीनला त्याच्या ‘वीर’ चित्रपटात येण्याची संधी दिली. हा चित्रपट काही विशेष गाजला नाही, पण झरीनला हा चित्रपट खूप आवडतो. तिला सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटातील ‘कॅरेक्टर ढीला है’ या आयटम साँगमधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. सध्या झरीना तिचा बॉयफ्रेंड शिवाशिष मिश्रासोबत गोव्यात सुट्टी घालवत आहे.

अलीकडेच झरीन खानने तिचा बॉयफ्रेंड शिवाशिष मिश्राच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी झरीनने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्याचवेळी शिवाशिष आकाशी रंगाचा टी-शर्ट घालून सेल्फी घेत होता.

तसेच यापूर्वी या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात शिवाशिष झरीनला स्वीटी म्हणत असल्याचे ऐकायला मिळाले होते. फोटो आणि व्हिडिओमध्ये दोघांमधील बॉंडिंग स्पष्टपणे दिसत आहे.

एक सामान्य व्यक्ती म्हणून ‘बिग बॉस १२’च्या पर्वात शिवाशिष मिश्रा आला होता. दरम्यान, तो या शोमध्ये विषेश असे काहीच करू शकला नाही, त्यामुळे त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर करण्यात आले. याआधी झरीनने शिवाशिषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांचे अनेक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वो टेढा है, पर वो मेरा है, शिव तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहोत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.” तसेच हार्ट इमोजींचाही समावेश तिने केला होता.

झरीनविषयी बोलायच झाले, तर ती अलीकडे प्रिन्स नरूलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. बॉलिवूडसोबत ती पंजाबी इंडस्ट्रीमध्येही धमाल करताना दिसत आहे. साजिद नाडियावालाच्या सुपरहिट मल्टीस्टारर ‘हॉउसफुल २’ आणि ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा