Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड वयाच्या 71व्या वर्षी झीनत अमानचे सौंदर्य पाहून फॅशन डिझायनरची पटली खात्री; म्हणाला, ‘वेळेला मात देते…’

वयाच्या 71व्या वर्षी झीनत अमानचे सौंदर्य पाहून फॅशन डिझायनरची पटली खात्री; म्हणाला, ‘वेळेला मात देते…’

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानने अलीकडेच फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांच्या स्टोर ओपनिंगला हजेरी लावली, ज्याचे फाेटाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. इतकेच नव्हे तर, चाहते अभिनेत्रीच्या पाेस्टवर कमेंट आणि लाईक करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

तर झाले असे की, शनिवारी (दि. 6 मे)ला अमित अग्रवाल (amit aggarwal) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर झीनत अमानसोबत काढलेले अनेक फोटो शेअर केले. ही फाेटाे त्यांच्या दिल्लीस्थित स्टोअरच्या उद्घाटन समारंभातील आहेत. यावेळी झीनत अमानने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला हाेता, तर अमित अग्रवालने देखील काळे कपडे परिधान केले हाेते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. झीनत अमानची स्टाइल अनेकांना चांगलीच आवडली आहे.

फोटो शेअर करताना अमित अग्रवाल यांनी लिहिले, “फोटो शेअर करताना अमित अग्रवाल यांनी लिहिले, ‘इटरनिटीला भावना असतात. ही गाेष्ट ब्रँडवर देखील लागू होते. तरीही, माेठी गाेष्ट नाही. कारण, एक ब्रँड म्हणून आपण झीनत अमानकडे आकर्षित झालो आहोत, जी वेळेला मात देते, जिला पाहून भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या कॅमेऱ्याची लेन्स ब्लर होत जाते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Aggarwal (@amitaggarwalofficial)

यावर उत्तर देताना झीनत अमानने लिहिले, ‘तुमच्या सुंदर नवीन स्टोअरमध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा.’ यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘झीनत अमान खूप सुंदर आणि नम्रही आहे.’, तर एकाने कमेंट करत लिहिले, ‘तू राणी आहेस.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमान अलीकडच्या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपुर्वी त्या उर्फी जावेदसोबत संवाद साधताना दिसल्या, ज्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल हाेत आहे.

झीनत अमान यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘कुर्बानी’, ‘डॉन’ आणि ‘यादों की बारात’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.(bollywood zeenat aman latest photos from fashion designer amit aggarwal store launch goes viral fans call her hollywood superstar )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅंडशेक करण्यासाठी आलेल्या लेडी फॅनसाेबत करीना कपूरने केले असे ‘कृत्य’, अभिनेत्रीची वागणूक पाहून चाहते थक्क
कंगनाच राजकारणाबाबत माेठं वक्तव्य म्हणाली, “देशाला माझी गरज असेल, तर मला…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा