Wednesday, July 3, 2024

बॉलिवूड कलाकारांनी देखील केले कलेचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे धुमधडाक्यात स्वागत

आज संपूर्ण देशात गणपती बाप्पांच्या आगमनाचीच लगबग आहे. वर्षभर आपण ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतो अखेर आज तो दिवस आला आहे. आज कलाकारांपासून सामान्यलोकं, नेते, खेळाडू सर्वांच्याच घरी बाप्पांचे दिमाखात आगमन झाले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी वाजतगाजत बाप्पाची स्थापना करतात. गणपती म्हणजे कलेचा देव. उत्तम कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला गणरायाचे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात. कलाकार देखील मनोभावे श्रींची आराधना करतात. आज बॉलिवूडमध्ये कलाकाराने बाप्पांचे स्वागत कसे केले पाहूया.

सलमान खान :

बॉलिवूडचा दबंग खान असलेल्या सलमानकडे देखील गणेशोत्सवाची धूम असते. सलमान दरवर्षी मनोभावे बाप्पांना घरी आणतो दिड दिवस त्याच्याकडे बाप्पांचा मुक्काम असतो. ह्यावर्षी सलमान शूटिंगच्या निमित्ताने देशाबाहेर आहे. मात्र तरीही त्याची बहीण असलेल्या अर्पिताने बाप्पांची स्थापना केली आहे. सलमानकडे गणपतीमध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र दिसते.

शिल्पा शेट्टी :

ह्यावर्षी शिल्पा गणपती बसवणार की, नाही हि बऱ्याच लोकांना शंका होती. कारण सध्या शिल्पाच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे. राज कुंद्रा तुरुंगात आहे. मात्र शिल्पाने तेवढ्याच उत्साहाने बाप्पांचे स्वागत केले आहे. शिल्पाने बाप्पांना घरी आणून त्यांची स्थापना केली आहे.

तुषार कपूर :

दरवर्षी जेष्ठ अभिनेते जितेंद्र त्यांच्या घरी बाप्पांचे दिमाखात स्वागत करतात. त्यांची ही परंपरा त्याचा मुलगा तुषार कपूर पुढे नेत आहे. यावर्षी तुषार कपूरने बाप्पांची स्थापना केली आहे. पांढऱ्या रंगाच्या मंडपात बाप्पांची रेखीव मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी तुषार कपूरचा मुलगा लक्ष आणि एकता कपूरचा मुलगा रवी देखील उपस्थित होते.

दिव्या खोसला-भूषण कुमार :

अभिनेत्री दिव्या खोसला आणि टी-सिरीज कंपनीचे मालक असलेल्या भूषण कुमार यांनी देखील टी-सिरीजच्या ऑफिसमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे.

सोनू सूद :

सोनू सूडाच्या घरी देखील दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बाप्पांचे आगमन धुमधडाक्यात झाले आहे. सहकुटुंब सोनुने बाप्पांची पूजा केली आणि घराबाहेर येत उभ्या असलेल्या सर्व फॅन्स आणि फोटोग्राफर्सला प्रसाद देखील वाटला.

रेमो डिसुझा :

बॉलिवूडचा लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक असणाऱ्या रेमोने देखील बाप्पांची मनोभावे स्थापना केली आहे. रेमो गणपतीचा किती मोठा भक्त आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक सामंत त्याच्या एक गाणे गणपती बाप्पांवर आधारित असतेच असते.

यासोबतच इतर अनेक कलाकारांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. सर्वानी बाप्पाजवळ कोरोना आपल्या आयुष्यातून लवकर निघून जावा ही प्रार्थना देखील केली

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा