Monday, July 1, 2024

बाेनी कपूर रमले श्रीदेवीच्या आठवणीत; फाेटाे शेअर करत म्हणाले, ‘हा आनंदाचा क्षण…’

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हटले जाते. श्रीदेवीने बॉलिवूडवर 5 दशके राज्य केले. या दरम्यान या दिग्गज अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर प्रत्येक प्रकारची व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली. 2018 मध्ये या अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. या धक्क्यातून या अभिनेत्रीचे पती आणि मुली आजपर्यंत बाहेर पडू शकलेले नाहीत. बोनी कपूर आणि जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर श्रीदेवीचे थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. अलीकडेच चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा एक जुना फोटो शेअर करून त्यांच्या पत्नीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रेस्टाॅरंटमध्ये क्लिक केला बाेनी कपूर आणि श्रीदेवीचा फाेटाे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बोनी कपूरने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला दिसत आहे. तर श्रीदेवीने कुर्ती परिधान केली आहे. हा फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा आनंदाचा क्षण होता, खूप आनंदाचा.”

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने तिच्या आई-वडिलांच्या या जुन्या फोटोवर हार्ट इमोजी टाकले आहे. जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. जान्हवी तिच्या आईशी तुलना केल्याबद्दल उघडपणे बोलत असते. जान्हवीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, “तिच्या आईशी तुलना केल्याने तिला वाईट वाटात नाही. कारण, तिची तुलना सर्वोत्तम अभिनेत्रीशी केली जाते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. खुशी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटातून डेब्यू करत आहेत.(boney kapoor remembers late wife sridevi shares throwback photo)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कंट्रोवर्शियल क्वीनच्या मदतील स्वत: अंबानी आले धावून; अभिनेत्री म्हणाली…

हे देखील वाचा