Saturday, June 29, 2024

बोनी कपूर यांची लाखोंची चांदीची भांडी निवडणूक आयोगाकडून जप्त, वाचा नक्की काय आहे प्रकरण

बॉलिवूडमधील हिट निर्माते असलेले बोनी कपूर सतत या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये गाजत असतात. मात्र सध्या त्यांचे मीडियामध्ये चर्चेत येण्याचे कारण वेगळे आणि गंभीर आहे. यावेल्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे चित्रपट नाही तर पोलीस केस आहे. झाले असे की, कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान लाखों रुपयांची चांदीची भांडी जप्त केली आहेत. ही सर्व भांडी बोनी कपूर यांची असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकातील दावणगेरेच्या हद्दीतील हेब्बालू टोलनाक्याजवळील चेकपोस्टवर ही भांडी जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार, कोणत्याही अधिकृत आणि संबंधित कागदपत्रांशिवाय ही सर्व चांदीची भांडी चेन्नईहून मुंबईला बीएमडब्ल्यू कारमधून नेली जात होती. भांडी पाच पेट्यांमध्ये ठेवली होती. या भांड्यांचा मालक बोनी कपूर असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एक बीएमडब्ल्यू कारमधून तब्बल 66 किलोग्राम चांदीची भांडी जप्त केली असून, याची किंमत 39 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी कारचा चालक सुलतान खान आणि प्रवासी हरीसिंग याच्याविरुद्ध दावणगेरे ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चांदीच्या भांड्यांमध्ये चांदीची वाटी, चमचे, पाण्याचे मग आणि प्लेट आदी भांड्यांचा समावेश आहे. ड्राइवर सुल्तान खान आणि अन्य प्रवासी असणारा हरि सिंगशी झालेल्या चौकशीत हरी सिंगने चांदीची भांडी बॉलीवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या कुटुंबाची असल्याचे सांगितले आहे.

सोबतच ज्या गाडीने ही भांडी नेण्यात येत होती ती कार बोनी कपूर यांच्या मालकीच्या ‘बेव्यू प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या नावावर रजिस्टर असल्याचे देखील समोर आले आहे. या संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. आता या सर्व प्रकरणामध्ये नक्की काय खरे आहे, याचा तापस पोलीस करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा