Monday, July 1, 2024

बोनी कपूर बनवणार त्यांच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा धमाकेदार सिक्वल

हिंदी सिनेसृष्टीमधे अनेक सुपरहिट चित्रपटाची निर्माती करणाऱ्या बोनी कपूर यांना ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या निर्मित चित्रपटांसोबतच त्यांनी आता एक अभिनेता अशी ओळख देखील मिळवली आहे. बोनी कपूर यांनी आजपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली असून, एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचाच एका सिनेमाचे ते सिक्वल करणार असल्याचे जाहीर केले आहे. सिक्वल होणारा सिनेमा आहे ‘मिस्टर इंडिया’. अनिल कपूर, अमरीश पुरी आणि श्रीदेवी यांच्या अभिनयाने समृद्ध आणि सुपरडुपर हिट अशा मिस्टर इंडियाचा सिक्वल काढण्याच्या सध्या चर्चा जोरावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारले गेले की,ते त्यांच्या कोणत्या सिनेमाचा सिक्वल काढू इच्छिता? यावर त्यांनी सांगितले की, “मी मिस्टर इंडिया २ बनवणार आहे. खरंच मी लवकरच यावर काम सुरु करणार आहे. आम्ही निर्मित केलेल्या ‘वॉन्टेड’, ‘नो एन्ट्री’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाच्या सिक्वलबद्दल लोकं खूप जास्त उत्साहित आहेत. याशिवाय असे लोकं देखील आहेत ज्यांना ‘हम पांच’ ला देखील पुन्हा बनवायचे आहे. माझ्या काही चित्रपटांचे आधीच कसे ना कसे रिमेक झाले आहेत. माझ्या कोणत्याच चित्रपटांना कोणत्याही कायदेशीर समस्या नाही. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये तसे दाखवले गेले होते. जेव्हा जे सिनेमे बनायचे ते नक्कीच बनतील.”

लवकरच बोनी कपूर एक अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. ते रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘मैं झूठा तू मक्कर’ सिनेमात दिसणार असून, याचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. लव रंजन यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तत्पूर्वी बोनी कपूर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यानी आतापर्यंत रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, लोफर, जुदाई, पुकार, हमारा दिल आपके पास है, शक्ति, जुदाई, रन, बेवफा, नो एंट्री, वॉन्टेड आदी अनेक हिट हिंदी आणि साऊथ सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर

हे देखील वाचा