Tuesday, January 27, 2026
Home बॉलीवूड Border 2 Collection Day 4: प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ‘धुरंधर’-‘छावा’लाही टाकले मागे

Border 2 Collection Day 4: प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ‘धुरंधर’-‘छावा’लाही टाकले मागे

सनी देओलची नुकतीच प्रदर्शित झालेली ‘बॉर्डर 2’ ही फिल्म बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसादासोबतच प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा मोठा फायदा चित्रपटाला झाला आहे. 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या वॉर ड्रामाने अवघ्या चार दिवसांतच 150 कोटींचा टप्पा पार केला असून आता 200 कोटींच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh)आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने ओपनिंग डे (शुक्रवार) रोजी भारतात 30 कोटी, शनिवारी 36.5 कोटी तर रविवारी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 2026 रोजी ‘बॉर्डर 2’ ने सर्व भाषांमध्ये मिळून 56 कोटींची तुफान कमाई करत 2025 मधील टॉप ग्रॉसिंग चित्रपट ‘धुरंधर’ (23.25 कोटी) आणि ‘छावा’ (24 कोटी) यांनाही मागे टाकले. हिंदी व्हर्जनची एकूण ऑक्युपन्सी 60.07% इतकी नोंदवली गेली आहे. चार दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 177 कोटी रुपये झाली आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त वरुण धवनने चाहत्यांसोबत ‘बॉर्डर 2’च्या यशाचा जल्लोष साजरा केला. त्याने आपल्या कारच्या छतावरून तिरंगा फडकावत आनंद व्यक्त केला. यानंतर तो सहकलाकार अहान शेट्टीसोबत क्रिकेट सामना पाहताना देखील दिसला.

कथेबद्दल बोलायचे झाल्यास, ‘बॉर्डर 2’ ही फिल्म 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित हा भव्य युद्धपट जे. पी. दत्तांच्या 1997 मधील क्लासिक ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्यासह मोना सिंह, सोनम बाजवा, अन्या सिंह आणि मेधा राणा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. वास्तविक घटनांवर आधारित ही फिल्म प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

बॉर्डर 2: कोण होते निर्मलजीत सिंह सेखों? ज्यांच्या शहादतीने डोळे पाणावले, दिलजीत दोसांझने भूमिकेत ओतला प्राण

हे देखील वाचा