Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड बॉर्डर 2 बॉक्स ऑफिस अंदाज: पहिल्या दिवशी सनी देओलचा रॉकेट ‘धुरंधर’च्या रेकॉर्डला टाकणार मागे

बॉर्डर 2 बॉक्स ऑफिस अंदाज: पहिल्या दिवशी सनी देओलचा रॉकेट ‘धुरंधर’च्या रेकॉर्डला टाकणार मागे

‘धुरंधर’च्या यशस्वी रननंतर आता बॉलिवूडच्या पुढील मोठ्या रिलीजकडे—‘बॉर्डर 2’कडे—सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ट्रेड एक्स्पर्ट्स आणि प्रेक्षकांमध्ये या भव्य अ‍ॅक्शन वॉर फिल्मबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलर रिलीज होताच मिळालेला जबरदस्त प्रतिसाद आणि रिलीजपूर्वीच वाढलेला क्रेझ पाहता, ‘बॉर्डर 2’ पहिल्याच दिवशी मोठे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स बनवू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या बॉक्स ऑफिसचं वातावरण ‘बॉर्डर 2’च्या बाजूने दिसत आहे. चित्रपटाला कोणत्याही मोठ्या रिलीजकडून तगडी टक्कर मिळत नाहीये. ‘हॅप्पी पटेल’ आणि ‘राहू केतू’ यांसारख्या चित्रपटांची कामगिरी कमकुवत ठरली आहे, तर रणवीर सिंगची ‘धुरंधर’ (Dhurandhar)शानदार रननंतर आता मंदावली आहे. साऊथचा ‘द राजा साब’ही हिंदी पट्ट्यात फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे ‘बॉर्डर 2’साठी मैदान जवळपास मोकळं असल्याचं मानलं जात आहे.

सुरुवातीच्या रिपोर्ट्स आणि सध्याच्या ट्रेण्ड्सनुसार ‘बॉर्डर 2’ पहिल्या दिवशी 25 ते 30 कोटी रुपयांची ओपनिंग करू शकते. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा प्रतिसाद अधिक मजबूत राहिल्यास हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘धुरंधर’ची भारतातील पहिल्या दिवसाची कमाई (28 कोटी रुपये)ही ‘बॉर्डर 2’ पार करू शकते.
चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग 19 जानेवारी 2025पासून सुरू झाली असून, पहिल्या 24 तासांतच जोरदार बुकिंग झाली आहे.

स्वतःचेच रेकॉर्ड मोडणार? ‘बॉर्डर 2’मधून सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे तिघेही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावरील वॉर फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट या तिन्ही कलाकारांच्या मागील चित्रपटांच्या एकत्रित ओपनिंगलाही मागे टाकू शकतो.

  • सनी देओलची ‘जाट’ – 9.62 कोटी
  • वरुण धवनची ‘सनी संकरी की तुलसी कुमारी’ – 10.11 कोटी
  • दिलजीत दोसांझची ‘जट्ट अँड जुलियट 3’ – 3.35 कोटी
    या तिन्हींची एकत्रित ओपनिंग 23.08 कोटी होती, जी ‘बॉर्डर 2’ सहज पार करेल, असा अंदाज आहे.

वसंत पंचमीमुळे अनेक ठिकाणी अंशतः सुट्टी असल्याने सिनेमागृहांमधील फुटफॉल वाढण्याची शक्यता आहे. ट्रेड पंडितांच्या मते, वीकएंडपर्यंत कमाईचा वेग आणखी वाढू शकतो.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत सुमारे 55,223 तिकिटांची विक्री केली असून 1.75 कोटी रुपये जमा केले आहेत. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा 4.62 कोटी रुपये आहे.

अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांच्यासह अहान शेट्टी, मोना सिंग, सोनम बाजवा, अनन्या सिंग आणि मेधा राणा महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. टी-सीरिज फिल्म्स आणि जेपी फिल्म्स निर्मित हा भव्य अ‍ॅक्शन वॉर ड्रामा 23 जानेवारी 2025 रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या आधी, जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘तारक मेहता…’च्या आधीपासूनच जेठालाल-बबीता यांची जोडी; आधीही पडद्यावर दिसली केमिस्ट्री, IMDb वर दमदार नोंद

हे देखील वाचा