सध्या जगभरात एक सिनेमा चांगलाच गाजतोय. तो सिनेमा इतर कुठला नसून ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ आहे. भल्याभल्या सिनेमांना मागे टाकत बार्बी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवतोय. जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर‘ या सिनेमाला मागे सोडल्यानंतर बार्बीने जगभरात कमाईच्या बाबतीत टॉम क्रूझ याच्या मिशन इम्पॉसिबल- 7 सिनेमालाही मागे टाकले आहे.
ग्रेटा गर्विग (Greta Gerwig) दिग्दर्शित ‘बार्बी’ (Barbie) सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक असे नवनवे विक्रम रचत आहे. विशेष म्हणजे, ‘ओपेनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमासोबत बार्बीदेखील 21 जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता.
भारतात बार्बी सिनेमा फक्त इंग्रजी भाषेतच रिलीज करण्यात आला. मार्गोट रॉबी (Margot Robbie) आणि रायन गॉस्लिंग (Ryan Gosling) अभिनित बार्बी सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहे.
‘बार्बी’ने जागतिक कमाईच्या बाबतीत ‘ओपेनहायमर’ सिनेमाला पछाडलेच. तसेच, टॉम क्रूझ (Tom Cruise) याचा ऍक्शन ऍडव्हेंचर सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन’ (Mission Impossible- Dead Reckoning Part One) या सिनेमालाही मागे सोडले आहे. चला तर बार्बीने भारत आणि जगभरात किती कमाई केली जाणून घेऊयात…
‘बार्बी’ने भारतात कमावले ‘एवढे’ कोटी
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका ग्रेटा गर्विग हॉलिवूडची अशी पहिली महिला दिग्दर्शिका आहे, जिच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमी काळात सर्वाधिक कमाई केली आहे. भारतात फक्त इंग्रजी भाषेत रिलीज होणाऱ्या या सिनेमाने 5 दिवसात फक्त 23.25 कोटींची कमाई केली आहे.
मात्र, भारतात ‘बार्बी’ सिनेमापेक्षा ‘ओपेनहायमर’ सिनेमाने जास्त वाहवा लुटली आहे. सिलियन मर्फी (Cillian Murphy) अभिनित सिनेमाने इंग्रजी भाषेत 5 दिवसात 54.19 कोटी रुपये कमावले आहेत. मंगळवारी (दि. 25 जुलै) ‘ओपेनहायमर’ सिनेमाची कमाई 5.54 कोटी होती, तर ‘बार्बी’ने फक्त 2.3 कोटीच कमावले.
‘बार्बी’ने ‘मिशन इम्पॉसिबल- 7’ला पछाडले
बार्बी सिनेमाची भारतातील कमाई कमी असली, तरीही जगभरात हा सिनेमा यशाच्या पायऱ्या चढत आहे. 4 दिवसांपर्यंत जागतिक बॉक्स ऑफिसवर 2760 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने मंगळवारी 440 कोटी रुपयांची कमाई केली. जगभरात तब्बल 1600 कोटी रुपयांची कमाी करणाऱ्या ‘ओपेनहायमर’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मात दिल्यानंतर ‘बार्बी’ने ‘मिशन इम्पॉसिबल- 7’ सिनेमालाही पछाडले. 5 दिवसात ‘बार्बी’ने जगभरात 3200 कोटी रुपये कमावले. तसेच, ‘मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंग पार्ट वन’ सिनेमाने 13 दिवसात फक्त 3020 कोटींची कमाई केली होती. (box office day 5 barbie film beat tom cruise mission impossible dead reckoning part one know more)
महत्त्वाच्या बातम्या-
‘आम्ही तुमच्यामुळेच…’, Kargil Vijay Diwasच्या निमित्ताने अक्षय कुमारने काढली शूरवीरांची आठवण
‘मी बहिरी नाहीये…’ म्हणत जया बच्चन यांची पापाराझींवर आगपाखड, नेटकरी म्हणाले, ‘म्हणून आमचे रेखावर प्रेम’