Friday, April 3, 2026
Home बॉलीवूड धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटाचा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशीही केली उत्तम कामगिरी

धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटाचा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशीही केली उत्तम कामगिरी

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18  मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर (dhar)दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत.

धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले आहेत अशा चित्रपटांना या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. सॅनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, ‘धुरंधर 2’ ने प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशीही चांगली कामगिरी केली आहे. तर या चित्रपटाने 17.80 कोटींची निव्वळ कमाई केली आहे. जी कालच्या 20.10 कोटींच्या एकूण कमाईपेक्षा कमी आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने एकूण 1,122.39 कोटींची कमाई केली असून, भारतातील एकूण निव्वळ कमाई 937.51 कोटींवर पोहोचली आहे.

धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. तर ‘पुष्पा 2: द राइज’ 1234.10 कोटी यांच्या एकूण कमाईला मागे टाकावे लागेल. कल्की, आरआरआर, केजीएफ चॅप्टर 2 या आश्या चित्रपटाना सुद्धा ‘धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटाने मागे टाकले आहे.

अभिनेता अजय देवगण याला काजोल देवगणने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा..!

हे देखील वाचा