Saturday, July 6, 2024

अनन्या पांडे अन् विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’मध्ये ‘या’ बॉक्सिंग लेजंडची एन्ट्री, कलाकारांनी केलं जोरदार स्वागत

दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा प्रथमच ‘लायगर’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री अनन्या पांडे बरोबर झळकणार आहे. ‘लायगर’ हिंदी आणि तामिळ या दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटायला येणार असून, अनन्याचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. अशात आता यामध्ये आणखी एक नवीन चेहरा समाविष्ट झाला आहे.

बॉक्सिंग स्टार माइक टॉयसनची या चित्रपटात एन्ट्री होणार आहे. या विषयीची माहिती अनन्या आणि विजयने स्वतः सोशल मीडिया मार्फत दिली आहे. अभिनेत्रीने सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने असे लिहिले आहे की, “नमस्कार टॉयसन, इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय पडद्यासाठी मास्टर ऑफ द रिंग डायनामाइट माइक टॉयसन #Liger मध्ये एन्ट्री करत आहेत.” (Boxing King Mike Tyson entry in ananya Pandey Vijay devarakonda film liger)

https://www.instagram.com/tv/CUUmRw_jh-1/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या व्हिडिओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. माइक टॉयसन येणार म्हणून सर्व रसिक प्रेक्षक खूप खुश आहेत. अशात विजयने देखील एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्याने असे लिहिले आहे की, “आम्ही तुम्हाला वेडेपणाची हद्द पार करणार असे वचन दिले होते आणि आता आम्ही त्याची सुरुवात करत आहोत. पहिल्यांदाच भारतीय पडद्यावर, आमच्या #LIGER चित्रपटामध्ये सहभागी होत आहेत, बॉक्सिंगचे देव, द लीजेंड, द बेस्ट, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. आयरन माइक टॉयसन. #नमस्कार टॉयसन.”

बॉलिवूडमध्ये विजय झळकणार म्हणून एक वेगळीच आनंदाची लाट पसरली होती. त्यात आता माइक टॉयसनच्या या बातमीमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. ‘लायगर’ चित्रपट हिंदी, तामिळ भाषेसह अन्य अनेक भाषांमध्ये दिसणार आहे. जगन्नाध दिग्दर्शित ‘लायगर’ हा चित्रपट करण जोहरने प्रोड्यूस केला आहे. चित्रपटामध्ये अनेक नवीन चेहरे येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा