Monday, July 1, 2024

‘ब्रम्हास्त्र’ने रिलीज होण्याआधीच तोडला ‘भुलभूलैया २’चा रेकॉर्ड, एडवांस बुकिंगने केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

बॉलिवूड आभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे आपल्या अपकमिंग चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’साठी खूपच चर्चेत आहेत. आलिया आणि रणबीर त्यांचे लग्न  झाल्यापासून ते चाहत्यांची प्रिय जोडपे ठरले आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. चित्रपट ब्रम्हास्त्र हा लवकरच चाहत्यांच्या भेटीसाठी योणार असल्याने टिकिट बुकिंग प्रक्रिया सुरु झाली आहे आणि आतापर्यत चांगलाच  गल्ला जमवल्याचे समोर आले आहे. पाहुया पुर्ण माहिती.

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल गाजवण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, यावरुन अंदाज लावू शकतो की या वर्षातील सगळ्यात मोठ्या ओपनिंगसोबत जास्त कमाई करणारा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट ठरु शकतो. बॉलिवूडसाठी ही खूपच चांगली आनंदाची गोष्ट ठरत आहेत. माहीतीनुसार चित्रपटाने आतापर्यत हिंदी भाषेतील 1,98,609 एवढे टिकिट विकले आहेत आणि ब्रम्हास्त्र थ्रीडीचे 1,75,365 टिकिट, आईमैक्सचे 15,229, आणि टूडी चे 8015 टिकिट आतापर्यत विकले आहेत. या विकलेल्या टिकेटावर जर चित्रपटाची कमाई काढली तर एकूण 6.98 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

या चित्रटाला तेलुगूमध्येही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तेलुगू भाषेमध्ये थ्रीडीला 11,595 टिकिट आणि टू-डी मध्ये 6,192 टिकिट विकले आहेत. यापासून चित्रपटाने आतापर्यत 29 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तामिळ भाषामध्ये चित्रपटाने आतापर्यंत 83 हजार टिकिट विकले आहेत. सोबतच या चित्रपटाच्या एडवांस बुकिंगने टोटल आतापर्यंत 7.28 कोटीचा गल्ला जमवला आहे.

आतापर्यत बॉलिवूडमध्ये एडवांस टिकिट बुकिंगचा रेकॉर्ड कार्तिक आर्यनच्या ‘भुलभूलैया 2’ च्या नावावर होता. पण आता रणबीर कपूरच्या अपकमिंग चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला मागे टाकले आहे. कार्तिक आर्यनचा चित्रपट भुलभलैया ने पहिल्याच दिवशी 14 कटीचे कलेक्शन केले होते. ब्रम्हास्त्र चित्रपटाची चर्चा पाहून आणि एडवांन्स बुकिंग पाहून वाटत आहे की, हा चित्रपट 25 कोटीपेक्षा जास्त कमाई करु शकतो.

ब्रम्हास्त्र हा चित्रपट यावर्षीचा बहुप्रतीक्षित चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटामध्ये रणबीर,आलीया भट्ट सोबत आणखी कलाकार  अभिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्गदर्शन अयान मुखर्जी करत आहेत आणि हा चित्रपट 9 सप्टेंबर दिवशी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
शहनाज गिलने भावासाेबत घेतले ‘लालबागच्या राजा’चे दर्शन, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूने वेधले सगळ्यांचे लक्ष
विद्युत जामवालने शेअर केला हनुमान चालीसाचा अनोखा फाेटाे; चाहते म्हणाले, ‘जय श्रीराम’
वयाच्या २१ व्या वर्षी शाहिद कपूरसोबत झाले लग्न, ‘या’ कारणामुळे मीरा देत होती लग्नाला नकार

हे देखील वाचा