Sunday, October 19, 2025
Home हॉलीवूड आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

हॉलिवूडच्या पॉप इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. या इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायिका असणाऱ्या रिटा ली जोन्स यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. ब्राझीलची मिलियन सेलिंग ‘क्वीन ऑफ रॉक’ नावाने प्रसिद्ध असलेल्या रिटा ली जोन्स यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या रंगीन शैलीमुळे आणि प्रतिभेमुळे त्यांनी हॉलिवूडमध्ये मोठी ओळख मिळवली.

‘ओवेल्हा नेग्रा’, ‘मेनिया डे वोके’ आणि ‘नाऊ ओनली मिसिंग यू’ आदी अनेक हिट चित्रपटांमधून रिटा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. रिटा ली जोन्स यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली गेली आहे. ज्यात ८ मे रोजी रिटा यांचे निधन झाल्याचे सांगितल्या गेले आहे. मात्र यात त्यांच्या निधनाचे कारण सांगितले गेले नाही. रिटा यांनी २०१० साली स्टेजवर परफॉर्म करणे बंद केले होते. शारीरिक त्रास आणि अशक्तपणा यामुळे त्यांनी परफॉर्म करणे बंद केले होते. त्यानंतर त्यांना 2011 साली फुप्फुसांचा कॅन्सर झाला होता. मात्र एक वर्षातच त्यांनी या आजारावर विजय मिळवला.

तब्बल सहा दशकं रिटा यांनी आपल्या आवाजाने लोकांचे मनोरंजन केले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना तीन मुलं आणि पती असून त्यांच्या त्यांच्या लग्नाला ४४ वर्ष झाली आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

भाऊ कदम यांनी केला आयुष्यातील सर्वात ‘गोड’ गोष्टीचा खुलासा, भावुक होत केले भरभरून कौतुक

Death Anniversary: ‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

हे देखील वाचा