Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन “कॅन्सरमध्ये वाचलेला व्यक्ती नेहमीच…” कॅन्सर सर्वाइवर अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

“कॅन्सरमध्ये वाचलेला व्यक्ती नेहमीच…” कॅन्सर सर्वाइवर अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून छवी मित्तलला ओळखले जाते. छवीने तिच्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांना तिची दखल घेण्यास भाग पाडले. चित्रपट, मालिका, ओटीटी अशा सर्वच मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये तिने काम करत आपली छाप पाडली. मागच्यावर्षी छवीने तिला कॅन्सर झाल्याचे सर्वांना सांगितले. छवीला ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि तिने त्यावर मात देखील केली. तिने तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यापासून ते तिच्या संपूर्ण उपचारापर्यंत सर्वच माहिती तिच्या फॅन्ससोबत शेअर केली. छवी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे.

आता देखील छवी तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे. छवीने तिच्या या उपचारामुळे आणि औषधांमुळे होणाऱ्या साईड इफेक्टवर एक पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. तिने तिचा एक फोटो पोस्ट करत पोस्टमध्ये लिहिले, “ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार सुरू झाले, त्या उपचारांपैकी एक मुख्य भाग म्हणजे टॅमॉक्सिफेन आहे, जे मला पुढील १० वर्षे (अजून ९ वर्ष) रोज घ्यायचे आहे. टॅमॉक्सिफेनमुळे हार्मोनल बदल होतात आणि बोन मिनरल डेंसिटी म्हणजेच हाडांची खनिज घनता कमी होते. यामुळे शरीरात अचानक फ्रॅक्चर होतात. (पायाला फ्रॅक्चर झालेले) मला ऑस्टियोपेनिय रुग्णाप्रमाणे ट्रिट केले आहे. ज्यामुळे मला भविष्यात मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचा मोठा धोका आहे. त्यावरील उपचारासाठी हे एक इंजेक्शन मी दोन दिवसांपूर्वी घेतले होते आणि त्या इंजेक्शनचे अनेक दुष्परिणाम आहेत. जे मला सध्या जाणवत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)


पुढे ती लिहिते, “हे इंजेक्शन घेतल्यानंतर माझी छाती, पाठ, खांदे, मानेत क्रॅम्प येत आहेत. दुखण्यामुळे श्वास घेता येत नाही. मला असे वाटते की मी आता मरणार आहे. आपले शरीर खराब होऊ लागते त्यावेळी असे जाणवते. इंजेक्शनचे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी मी दुसरी औषधे घेतली. माझे सर्व सांधे तुटले असल्याचे मला वाटते, याला बटरफ्लाय इफेक्ट म्हणातात. पण माझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे?
कॅन्सरमध्ये एकदा वाचलेला व्यक्ती नेहमीच कॅन्सर सर्वाइवर राहतो. कॅन्सरमधून वाचलेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. जे लोक अशाच गोष्टींमधून गेले आहेत आणि दररोज जीवन जगण्यासाठी त्रास घेत आहेत त्यांना मी हेच सांगू शकते, की आजचा दिवस चांगला नसेल, मात्र उद्याचा दिवस चांगला असेल, अशी पूर्ण खात्री आहे.”

दरम्यान छवीबद्दल सांगायचे झाल्यास ‘3 बहुरानियां’, ‘तुम्हारी दिशा’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘नागिन’, ‘एक चुटकी आसमान’, ‘विरासत’, ‘कृष्णादासी’ आदी मालिकांमध्ये तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २००४ मध्ये दिग्दर्शक मोहित हुसैनशी लग्न केल्यानंतर त्यांना २०१२ मध्ये मुलगी आणि २०१९ मध्ये मुलगा झाला. छवीने २०१५ मध्ये पती मोहितसह शिट्टी आइडियाज ट्रेंडिंग (SIT) या डिजीटल प्रोडक्शन कंपनीची सह-स्थापना केली.

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा