मीडियामध्ये नेहमीच कलाकार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. रोज तर ते त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत नसतात. पण याव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टींमुळे कलाकार मोठ्या प्रमाणावर चर्चेत येतात. चित्रपटांशिवाय कलाकार सर्वात जास्त चर्चेत येण्याचे दुसरे कारण म्हणजे फॅशन. कलाकार त्यांच्या फॅशनमुळे अनेकदा चर्चेत येतात. कधी कधी कलाकारांची फॅशन चुकते तर कधी कधी त्यांची फॅशन त्यांना मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे आणते. मात्र हीच फॅशन कलाकारांना कधीकधी गोत्यात देखील आणते.
अनेकदा आपण पाहिले असेल की, अभिनेत्रींना उप्स मुव्हमेंट्सचा सामना करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा ड्रेस धोका देतो, याचा प्रत्यय अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींना आला आहे. मात्र ब्रिटिश गायिकेला तर तिच्या ड्रेसने खूपच मोठा धोका दिला आहे. तिच्या या उप्स मुव्हमेंट्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ब्रिटिश गायिका असणाऱ्या चार्ली XCX ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या उप्स मुव्हमेंटचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “अभिनंदन मित्रांनो”. या व्हिडिओमध्ये चार्ली ऑस्ट्रेलियन रिकॉर्डिंग इंडस्ट्री असोसिएशन पुरस्कार सादर करत होती. तेवढ्यात तिचा ड्रेस खांद्यावरून खाली घसरला आणि ती उप्स मुव्हमेंटची शिकार झाली. हा पुरस्कार सोहळा व्हर्चुअल ऑर्गनाइज केला होता.
या व्हिडिओमध्ये चार्ली The Kid Laroi आणि जस्टिन बीबरला बेस्ट पॉप रिलीज पुरस्कार देत होती. यादरम्यान तिने घातलेला काळ्या रंगाचा शॉर्ट वन पीस ड्रेस घातला होता. चार्लीने विजेत्यांची नावे जाहीर केली आणि तेव्हाच तिचा ड्रेस खांद्यावरून घसरला आणि तिची बॉडी रिव्हिल झाली. हा व्हिडिओ ब्लर केला आहे. तिचा ड्रेस इतक्या जोरात घसरला की ती सांभाळते तोपर्यंत ती उप्स मुव्हमेंटचा शिकार झाली होती. पण चार्लीने ही घटना खूपच सकारत्मक पद्धतीने घेतली. जसा तिचा ड्रेस खांद्यावरून घसरला तशा लगेच तिने तो पकडला आणि तो पडण्यापासून वाचवला. आणि ती जोरजोरात हसायला लागली. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव तिने येऊ दिले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार
–लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार










