Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर

सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर

बॉलिवुडमधील हॉट अभिनेत्री ब्रूना अब्दुल्ला ही तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे चांगलीच लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात तिने नाव कमावले आहे. तिने पुनित मल्होत्राने दिग्दर्शित केलेल्या ‘आय हेट‌ लव्हस्टोरी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच एडल्ट कॉमेडी ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात देखील काम केले आहे. 2012 मध्ये तिने ‘बिल्ला’ या चित्रपटात काम करून मोठे नाव कमावले होते.

चित्रपटा व्यतिरिक्त ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे आणि स्टाईलमध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. असेच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ब्रूनाने बिकिनी घातली आहे.

अभिनेत्री ब्रूनाने तिचे हे हॉट बिकिनीमधील फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले आहे. तीने या फोटोमध्ये ऍनिमल प्रिंटेड बिकिनी घातली आहे. तसेच ती समुद्रकिनाऱ्यावर‌‌ पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियाचा पारा अक्षरशः वाढला आहे.

अनेकजण तिचे हे फोटो पाहून कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच तिचे कौतुक करताना तिला प्रतिसाद देखील देत आहेत. तसेच तिने स्विमिंग सुटमधील देखील तिचे फोटो शेअर केले आहे. तर एका फोटोमध्ये ती तिच्या छोट्या मुलीसोबत देखील दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

ब्रूना अब्दुल्ला ही मूळची भारतातली नाहीये. तिचा जन्म ब्राझीलमध्ये झाला आहे. तिचे वडील हे लेबनानी आहेत तर आई इटालियन पोर्तुगाल आहे. ब्रूना ही भारतात एक प्रवासी बनून आली होती आणि भारतात आल्यानंतर मात्र तिने बॉलिवूडमध्ये काम करून तिचे एक वेगळेच नाव कमावले आहे.

तिने अक्षय कुमार सोबत देसी बॉईज या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटानंतर तिला सर्वत्र ओळख मिळाली आणि बॉलिवूडमध्ये तिचे स्वतंत्र असे नाव निर्माण झाले. जेव्हा बोल्ड अभिनेत्रींची यादी समोर येते तेव्हा तिथे ब्रूना अब्दुल्ला हिचा उल्लेख नेहमीच होत असतो.

ब्रुनाचे आजपर्यंतचे हिंदी सिनेमे- आय हेट लव्ह स्टोरी, कॅश, देसी बॉईज, बिल्ला २, ग्रँड मस्ती, जय हो, मस्तीजादे, ये तो टू मच हो गया, उडंच्छू

हे देखील वाचा