Tuesday, July 9, 2024

लय भारी! मार्व्हलच्या ‘इटर्नल्स’ चित्रपटात वाजले ‘बीटीएस’ बँडमधील सिंगर जिमिनचे गाणे, चाहतेही खुश

जगभरातील चित्रपटप्रेमी मार्व्हलच्या ‘इटर्नल्स’ या नवीन चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. नुकताच ‘इटर्नल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून जबरदस्त चर्चेत आहे. अशातच कोरियाचा प्रसिद्ध के पॉप सिंगर बँड  ‘बीटीएस’मधील सदस्य जिमिनचे एक गाणे चर्चेत आले आहे. या गाण्याची चर्चा होण्यामागील कारण आहे, मार्व्हलच्या ‘इटर्नल्स’ चित्रपटातील एका भागात जिमिनच्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. जिमिनच्या गाण्याचे नाव ‘फ्रेंड्स’ असे आहे. आता जिमिनचे चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

जिमिनचे चाहत्यांना उत्तर
यावर जिमिनचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्याची जिमिनचे चाहते उत्सुक आहेत. आतापर्यंत जिमिनने त्याच्या गाण्याच्या वापरावर काहीही सांगितले नव्हते. त्याने त्याच्या एका चाहत्याच्या कमेंटवर प्रतिक्रिया देताना स्वतःची गोष्ट सांगितली आहे. बीटीएसच्या या सदस्याने गुरुवारी त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सवर उत्तर दिले. (BTS Jimins Song Friends Is A Part of Marvel Eternals On The Comments of Fans)

अद्याप पाहिला नाही ‘इटर्नल्स’
ट्विटरवर हॅना नावाच्या युजरने कोरियन भाषेचे भाषांतर करून ट्वrट केले आहे. ज्यामध्ये जिमिनच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “मी इटर्नल्स पाहिला आणि त्यात फ्रेंड्स गाणे वाजवण्यात आले. तुमचा हृदयस्पर्शी आवाज ऐकला, तेव्हा मला खूप आनंद झाला.” यावर जिमिन म्हणाला की, “मी तो अजून पाहिला नाही.”

असे असले, तरीही ‘इटर्नल्स’चे दिग्दर्शक क्लो झाओने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, “फ्रेंड्स हे बीटीएसच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. मला जिमिन आवडतो आणि तो खरोखरच गोंडस आहे.”

एका चाहत्याच्या कमेंटने झाला भावुक
जिमिनने दुसर्‍या चाहत्याच्या कमेंटला उत्तर दिले, ज्याने लिहिले होते की, “जिमिन ५ अक्षर माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढवतात. जिमिन तू माझ्या जगण्याचे कारण आहेस. मला जिवंत ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझी खूप आठवण येते.” यावर जिमिन म्हणाला की, “तुम्ही खूप सुंदर शब्द लिहिले आहेत, इतका वेळ लावल्याबद्दल मला खेद व्यक्त करतो.”

खरं तर, बीटीएस बँड, ज्याला बॅगटन बॉईजदेखील म्हणतात. हा दक्षिण कोरियाचा एक पॉप बँड आहे. या बँडची लोकप्रियता जगभर आहे. या बँडमध्ये एकूण ७ सदस्य असून, सर्व सदस्य जवळपास सारख्याच वयाचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा