Saturday, June 29, 2024

मोठ्या दणक्यात सुरु आहे प्रभासच्या आगामी ‘सालार’ सिनेमाची शूटिंग, समोर आले फोटो

साऊथ स्टार ‘प्रभास’ने बाहुबली या सिनेमानंतर पॅन इंडिया लोकप्रियता मिळवली. त्याच्या करियर मधला सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला या सिनेमात १५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत इतिहास रचला होता. त्यानंतर प्रभासचे जेवढे सिनेमे आले, किंवा येणार आहे त्या सर्व सिनेमांसाठी प्रेक्षकांची विशेष क्रेझ दिसून येत आहे. २०२३ या साली प्रभासचा चर्चित असलेला प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची देखील फॅन्समध्ये विशेष क्रेझ आहे.

‘केजीएफ’ सिनेमाच्या यशानंतर प्रशांत नील यांची लोकप्रियता तुफान वाढली आहे. आता एकीकडे सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि दुसरीकडे सुपरहिट दिग्दर्शक प्रशांत नील या जोडीचा ‘सालार’ सिनेमा किती धुमाकूळ घालणार हे तर वेळेचं सांगेल. तत्पूर्वी सध्या सिनेमाचे शूटिंग चालू आहे. या सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेटवरचे काही कॅन्डीड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

निर्मात्यांनी ‘सालार’ सिनेमाच्या सेटवरचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “शूटिंग इन प्रोग्रेस’ हे फोटो रात्रीच्या शुटिंगचे आहे. हे फोटो पाहून आता सिनेप्रेमींची सिनेमाबद्दल असणारी उत्सुकता अधिकच वाढली आहे. सिनेमात प्रभासचा ताबडतोड ऍक्शन अंदाज सर्वांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रभासोबत श्रुती हसन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने, या दोघांची ऑनस्क्रीन जोडी पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहे.

‘सालार’च्या निमित्ताने प्रशांत आणि प्रभास दोघेही पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार निर्माते या सिनेमाला मोठ्या आणि भव्य स्वरूपात तयार करत आहे. होम्बले फिल्म्सच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट तब्बल ४०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाच्या सोबत ‘केजीएफ’चीच क्रिएटिव टीम आणि टेक्निकल टीम काम करत आहे. होम्बले फिल्म्सने ‘सालार’आधी केजीएफ’, ‘केजीएफ 2’ आणि ‘कांतारा’ असे तगडे हिट सिनेमे दिले असल्यामुळे ‘सालार’ कडून देखील लोकांना खूप अपेक्षा आहेत. ‘सालार’ हा सिनेमा २८ सप्टेंबर २०२३ रोजी ५ प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभास, श्रुति हसन. पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी आदी कलाकार दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लहान असताना शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे वाटायचा बहीण शमिता शेट्टीचा मत्सर
सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’3 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा