Tuesday, August 12, 2025
Home अन्य कोरियन-पॉप सिंगर जिमिनच्या आयुष्यात होता ‘हा’ मोठा अडथळा; त्याच्या शिक्षकाने केला खुलासा

कोरियन-पॉप सिंगर जिमिनच्या आयुष्यात होता ‘हा’ मोठा अडथळा; त्याच्या शिक्षकाने केला खुलासा

कलेच्या जोरावर लोक प्रसिद्धी कमावतात, भरघोस पैसे मिळवतात, लाखो चाहतेही बनवतात. परंतु, तरी देखील कलेच्या जीवावर संपूर्ण आयुष्य जगणे कठीण असते व स्वतःसह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण असते, असे अनेक जाणकार आणि अनुभवी मंडळी मांडतात. सुरुवातीच्या काळात काही कलाकारांना खूप अपयश देखील सहन करावे लागले आहे. अनेकदा त्यांनी केलेल्या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. अशात अनेकजण नैराश्यामध्ये जातात. तसेच काही कलाकारांचे नशीब एवढे उज्वल असते की, त्यांची पहिलीच झलक प्रेक्षकांचे मन जिंकते. याचप्रमाणे बीटीएस जिमिनने देखील भरघोस यश संपादन केले आहे.

जिमिन हा दक्षिण कोरियामधील सुप्रसिद्ध गायक आणि डान्सर आहे. त्याने आपल्या कलेच्या जोरावर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो दक्षिण कोरियन बँड बीटीएसचा मेंबर असून, आज जगातील सर्वात लोकप्रिय कोरियन-पॉप सेलेब्सपैकी एक आहे. त्याच्या आयुष्यामध्ये देखील सुरुवातीला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विरोध करण्यात आला होता. शिक्षकांचा विरोध असून देखील त्याने आपल्यातील कलागुणांना वाव देण्याचा एक प्रयत्न केला आणि तो आपल्या सगळ्यांसमोर एक यशस्वी कलाकार म्हणून उभा आहे. (BTS singer jimin school teacher Mr Lee opposed his dream)

जिमिन बुसान हायस्कूल ऑफ आर्टमध्ये शालेय शिक्षण घेत असताना, बिमिन हिट एंटरटेनमेंटसाठी ऑडिशन सुरु होते. त्यालाही यामध्ये ऑडिशन द्यायचे होते. परंतु त्याचे घरगुती शिक्षक मिस्टर ली यांनी त्याला विरोध केला होता. साल २०१९मध्ये कोरियन पत्रकारांशी बोलताना त्याच्या सरांनी या गोष्टीचा खुलासा केला. मिस्टर ली म्हणाले की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर जिमिनला मीच सुरुवातीला विरोध केला होता. एक मोठा कलाकार व्हायचे स्वप्न पाहणे सोपे आहे. परंतु ते प्रत्यक्षात साकारणे तितकेच कठीण आहे. जिमिनने मला सांगितले होते की, तो निर्माता बांग सी ह्युकसाठी ऑडिशन देत आहे. तेव्हा मला ते आवडले नाही. मी त्याला तेव्हाच विरोध करत ही तुझी पहिली आणि शेवटची ऑडिशन आहे असं म्हणालो होतो. पुढे जर काही नाही झालं, तर तुला शिक्षण आणि संगीत यातील एक पर्याय निवडावा लागेल. परंतु तो या ऑडिशनमध्ये विजयी झाला.”

जेव्हा जिमिनचे सिलेक्शन झाले, त्यानंतर त्याच्या शिक्षकांना विश्वास बसला की हा आयुष्यात खूप पुढे जाणार. तसेच काहीतरी मोठी कामगिरी नक्की करणार. पुढे त्याच्याबद्दल बोलताना त्याच्या शिक्षकांनी आणखी एक खुलासा केला. ते म्हणाले की,”जिमिन जेव्हा दहावीमध्ये होता, तेव्हा त्याने माझ्या लग्नात त्याच्या वर्ग मित्रासह डान्स केला होता. त्याने तो डान्स इतका उत्कृष्ट केला होता की, असे वाटत होते तो कोणत्यातरी स्पर्धेत सहभागी झाला आहे.” प्रत्येकाच्या वाटेत जसे अडथळे येतात, तसेच जिमिनच्या वाटेमध्ये देखील एक अडथळा होता. परंतु त्याने जिद्दीने त्याच्या शिक्षकांना त्याच्यात लपलेले गुण उघडपणे दाखवून सर्वकाही बदलून टाकले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा