रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक, भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान अशा ‘अँटिलिया’ नावाच्या घरामध्ये राहतात. त्यांचे घर तर सर्वांसाठीच जणू एक पर्यटन स्पॉट बनले आहे. मुकेश अंबानींचे ‘अँटिलिया’ हे घर कोणत्याही मोठ्या महालापेक्षा कमी नाही. या घरात मुकेश अंबानी त्यांची आई, पत्नी पत्नी नीता अंबानी, दोन मुले, सून, नातवासह राहतात. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर त्यांचे घरही तसेच असणार ना. त्यांच्या सारखे सर्व सुखसोयींनी युक्त असे घर बांधणे बॉलिवूडमधील मोठ्यातल्या मोठ्या कलाकाराला देखील शक्य नाही.
तसे तर, बॉलिवूड कलाकारसुद्धा आलिशान घरांचे मालक आहेत. परंतु, अँटिलियामधील विशेष गोष्टी केवळ अंबानी कुटुंबातील लोकांसाठीच शक्य आहेत. आता फक्त कल्पना करा की, २७ मजल्यांचे जगातील सर्वात आलिशान घर बांधण्यासाठी किती अब्ज रुपयांची आवश्यकता असेल. या घराला पौराणिक अटलांटिक बेटापासून प्रेरित होऊन बांधले गेले आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे घर केवळ मुंबईतच नाही, तर परदेशातही आहे. प्रियंका चोप्राचे मुंबईतसोबतच अमेरिकेतसुद्धा एक आलिशान घर आहे. सलमान खानच्या घराविषयी बोलायच झाल, तर तो मुंबईमध्ये ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्याचे नाव ‘गॅलेक्सी’ आहे. त्याच्या फ्लॅटची किंमत सुमारे २०९ कोटी रुपये आहे.
दुसरीकडे, मुंबईच्या दक्षिणेस अल्टामाउंट रोडवर बांधलेल्या अँटिलियाबद्दल बोलायच झाले, तर ‘अँटिलिया’ हे घर २७ मजल्यांचे असून, ४,००,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. अँटिलियाच्या खाली पहिले सहा मजले पार्किंगसाठी आहेत. यामध्ये १६८ कार एकाच वेळी पार्क केल्या जाऊ शकतात. मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह वरच्या मजल्यांवर राहतात.
गर्मीपासून वाचण्यासाठी या घरात बर्फाची खोलीही बांधण्यात आली आहे. प्रत्येक मजल्याचा आतील भाग वेगळा आहे. मुकेश अंबानींच्या घरात, हेलिपॅड, जिम, सिनेमा हॉल आणि आदी अनेक वेगवेगळ्या सुविधांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. बॉलिवूड कलाकारांकडे खासगी जेट नक्कीच आहे, मात्र त्यांच्या घरी हेलिपॅडसारखी सुविधा नाही.
पतौडीचा नवाब असणाऱ्या सैफ अली खानकडे जे पॅलेस आहे, त्याची किंमत अँटिलियाच्या किंमतीच्या आसपासही नाही. पतौडी पॅलेसमध्ये एकूण १५० खोल्या आहेत. ज्यात सात ड्रेसिंग रूम, सात बेडरुम, सात बिलियर्ड रूम आणि एक मोठी डायनिंग रूम आहे. हे सैफ अली खानचे आजोबा इफ्तिखार अली खान यांनी बांधले होते. या पॅलेसची रचना रॉबर्ट टोर रसेल यांनी केली होती. या आलिशान महालाची किंमत ८०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
अजय देवगण त्याची पत्नी काजोल, मुलगा युग आणि मुलगी न्यासा आणि आईसह मुंबईचा पॉश एरिया असलेल्या जुहूमध्ये राहतो. अजय देवगण आणि काजोलच्या बंगल्याचे नाव ‘शिवशक्ती’ आहे. हा बंगला आतून आणि बाहेरून खूप सुंदर दिसतो. काजोलच्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, लायब्ररी आणि स्पोर्ट्स रूम देखील आहेत. या बंगल्याची किंमत ५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
शिल्पा आणि राज कुंद्राच्या सी-फेसिंग व्हिलाचे नाव ‘किनारा’ आहे. या घरात शिल्पा पती राज कुंद्रा, मुलगा वियान कुंद्रा आणि मुलगी समिशा यांच्यासोबत राहते. शिल्पाचे घर आतून खूपच सुंदर आणि आलिशान आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंगल्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे.
अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ हा बंगला जुहू येथे आहे. ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहतात. त्यांचा हा बंगला पर्यटन स्थळासारखा झाला आहे. देशभरातून लोक जेव्हा मुंबईत फिरायला येतात, तेव्हा अमिताभ यांचा बंगला नक्कीच पाहतात. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत पाच बंगले आहेत. ‘जलसा’ची किंमत १०० ते १२० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
शाहरुख खानच्या बंगल्याचे नाव ‘मन्नत’ असून तोही जुहू परिसरातच आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानने तो सजवला असून, गौरी एक इंटिरियर डिझायनर आहे. हा बंगला पूर्वी व्हिला व्हिएन्ना म्हणून ओळखला जात होता. ‘मन्नत’ची किंमत अंदाजे २०० कोटी रुपये आहे.
एकूणच काय तर या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन जरी अंबानींच्या घरांसारखे घर बंधू शकणार नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’