Monday, July 1, 2024

अत्यंत धक्कादायक! प्रख्यात अभिनेत्री ‘समंथा’ हिचे अकाली निधन, सिनेविश्वावर शोककळा

कॅनेडियन अभिनेत्री आणि संगीतकार असलेल्या समंथा वाइनस्टीन हीचे दुःखद निधन झाले आहे. टोरंटोच्या प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटलमध्ये तिला साधारण अडीच वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर ती त्यावर उपचार देखील घेत होती, मात्र यातच आता तिचे निधन झाले. वाइनस्टीन वयाच्या सहाव्या वर्षापासून अभिनय करत होती. अभिनयासोबतच तिने व्हॉइस आर्टिस्ट म्हणून देखील काम केले होते. समंथाने अनेक अॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिकांमध्ये विविध पात्रांना आवाज दिला होता.

समंथाच्या निधनानंतर तिचे वडील असलेल्या डेव्हिड वाइनस्टीन यांनी सांगितले की, “सॅम खूप सकारात्मक होती. तिला जो भेटायचं किंवा ती ज्याला भेटायची ती व्यक्ती देखील सकारत्मक होऊन जायची. क्लो ग्रेस मोर्ट्झ आणि ज्युलियन मूर अभिनीत “कॅरी” च्या 2013 साली आलेल्या रिमेकमध्ये समंथा वाइनस्टीनने एका विद्यार्थिनीची हीदरची भूमिका केली होती.

समंथाने काम केलेल्या “बिग गर्ल” सिनेमाला 2005 सालच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट कॅनेडियन लघुपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या सिनेमातील तिच्या समंथाच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा २००६ सालाचा अलायन्स ऑफ कॅनेडियन सिनेमा, टेलिव्हिजन आणि रेडिओ आर्टिस्ट (एक्टीआरए) पुरस्कार देखील मिळविला. वयाच्या 10 व्या वर्षी हा सन्मान मिळवणारी ती सर्वात तरुण अभिनेत्री ठरली होती.

समंथा वाइनस्टीनला संगीताची देखील आवड होती. ती टोरंटो-आधारित गॅरेज रॉक बँड किलर व्हर्जिन्सची मुख्य गायिका आणि गिटार वादक होती. तिला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर वाइनस्टीनने शक्य तितके चांगले जीवन जगण्याचा संकल्प करत तिने खूप प्रवास केला आणि आनंद लुटला.

हे देखील वाचा