Monday, July 1, 2024

‘कॅन्सर सर्व्हायव्हर’ छवी मित्तलला ट्रोल करणं नेटकऱ्यांना पडलं महागात, अभिनेत्रीने थेट…

अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) नुकतेच सांगितले होते की, ती ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. मात्र, छवीवर शस्त्रक्रिया झाली असून, आता ती हळूहळू बरी होत आहे. छवी मित्तलने सोशल मीडियावर तिच्या कठीण दिवसांबद्दल मोकळेपणाने सांगितले. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पण आता अभिनेत्रीला या कारणामुळे ट्रोल व्हावे लागत आहे. सोशल मीडियावर एका वापरकर्त्याने छवी मित्तलवर सहानुभूती मिळवल्याचा आरोप केला आहे, ज्याला अभिनेत्रीनेही चोख प्रत्युत्तर दिले.

छवी मित्तलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जो एका यूजरचा स्क्रीनशॉट आहे. छवी मित्तलने या पोस्टसोबत लिहिले की, “ही कमेंट माझ्या पोस्टची आहे, ज्यामध्ये मी माझ्या स्तनाच्या कर्करोगाचा खुलासा केला आहे. यादरम्यान लोकांनी माझ्याबद्दल अनेक कमेंट्स केल्या आहेत. मी माझ्या स्वेच्छेने स्तनाचा कर्करोग आजार निवडलेला नाही. इथे दुःखाची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा आजार होऊनही तुम्ही तुमची अवस्था शब्दात वर्णन करू शकत नाही.” (cancer survivor chhavi mittal angry at netizens)

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही ते जाणवू शकत नाही. हे लोकांना सांगण्यासाठी मला किती हिंमत लागली असेल, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.” अभिनेत्री पुढे म्हणाली की, “माझ्यात हिम्मत होती आणि म्हणूनच मी याबद्दल बोलले. पण तुम्ही लोक या कॅन्सर पेशंटलाही ट्रोल करत आहात.” अभिनेत्रीच्या मते, लोक तिच्या आयुष्यात नकारात्मकता मिसळत आहेत.

छवी मित्तल जेव्हा छातीला झालेल्या दुखापतीवर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती, तेव्हा तिला कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली. यानंतर अभिनेत्रीवर तातडीने उपचार करण्यात आले. पण उपचाराच्या दिवसांत छवीने तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांनाच चकित केले. तिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये डान्स करताना दिसत होती.

हे देखील वाचा