Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड कान्स चित्रपट महोत्सवात भारताला मिळाला ‘हा’ विशेष सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला मिळाला ‘हा’ विशेष सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद

सध्या भारतीय सिनेजगताला सुगीचे दिवस आलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजेच सध्या भारतीय चित्रपटांची चर्चा विदेशातही पाहायला मिळत आहे. याचेच उदाहरण म्हणजे 2022 कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. या वर्षी प्रथमच भारत ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहे. कान्स 2022 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाच्या उपस्थितीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संदेश जारी केला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गौरवाबद्दल कौतुकही केले आहे. काय म्हणाले नेमंक नरेंद्र मोदींनी चला जाणून घेऊ.

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला अधिकृतरीत्या सन्मानाचा देश म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे. याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की “मार्च डु फिल्म – फेस्टिव्हल डी कान्समध्ये भारताच्या सहभागाबद्दल आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारताच्या सहभागाबद्दल मला आनंद झाला आहे. तसेच फ्रान्सशी 75 वर्षांचे राजनैतिक संबंध आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक सत्यजित रे यांचा चित्रपट कान्स क्लासिक विभागात प्रदर्शनासाठी पुनर्संचयित करण्यात आला आहे हे जाणून आनंद झाला.”

याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की “इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक चित्रपट बनले आहेत. इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात. आपल्या चित्रपट क्षेत्रातील विविधता उल्लेखनीय आहे. चित्रपट आणि समाज हे एकमेकांचे आरसे आहेत. सिनेमांमधून मानवी आयुष्य आणि अभिव्यक्ती कलात्मक रीतीने चित्रित करतो जे जगाला मनोरंजनाच्या समान धाग्याने जोडते. भारतातील अनेक स्टार्टअप्स सिने जगताला आपली ताकद दाखवतील. इंडिया पॅव्हेलियन भारतीय सिनेमाचे पैलू प्रदर्शित करेल आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देईल.” विशेष म्हणजे या महोत्सवात अभिनेता जितेंद्र जोशीच्या गोदावरी चित्रपटाचीही निवड करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा