Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोठी बातमी! कपिल शर्माला मिळाली ७ वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची शिक्षा, अमेरिकेत झालाय गुन्हा दाखल

प्रेक्षकांना आपल्या विनोदाने पोट धरून हसायला भाग पाडणारा हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कपिल याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तो कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. कपिल सध्या त्याच्या टीमसोबत कॅनडा दौऱ्यावर आहे. अशात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण यामागील कारण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया…

कॅनडा दौऱ्यावर असतानाच कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर करार पूर्ण न करण्याचा आरोप आहे. मात्र, हे प्रकरण आताचे नसून २०१५ सालचे आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, साई यूएसओ आयएनसी कंपनीने कपिलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सन २०१५मध्ये कपिलने नॉर्थ अमेरिकेत काही शोसाठी करार करण्यात आले होते. मात्र, हे करार त्याने पूर्ण केले नाहीत. अमेरिकेतील प्रसिद्ध शो प्रमोटर असलेले अमित जेटली यांनी म्हटले की, “कपिलने ६ शो करण्यासाठी करार केला होता. त्यासाठी त्याला पैसेही देण्यात आले होते. मात्र, कपिलने त्यामधील एकही शो केला नाही. त्याने वचन दिले होते की, तो पैसे परत करेल, पण त्याने पैसे दिले नाहीत. तो परफॉर्मही करायला आला नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्रतिसादही दिला नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही त्याच्याशी अनेकदा चर्चा केली. मात्र, ते होऊ शकले नाही.”

“हे प्रकरण आता न्यूयॉर्क न्यायालयात आहे आणि निश्चितच कपिलविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे जेटली यांनी पुढे बोलताना म्हटले.

कपिल शर्मा हा मागील महिन्यापासून परदेशात आहे. नुकतेच त्याने व्हँकुव्हर येथे परफॉर्मन्स केला होता. याठिकाणी त्याच्यासोबत कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, चंदन, कीकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती हेदेखील उपस्थित होते. मात्र, ही संपूर्ण टीम सध्या टोरँटो येथे आहे.

कपिलविरुद्धच्या या कारवाईबाबत काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कपिलने शोव्यतिरिक्त सिनेमातही काम केले आहे. त्याच्या सिनेमांमध्ये ‘किस किस को प्यार करू’ आणि ‘फिरंगी’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘जबरे पिया’ गाण्यावर बेभान होऊन नाचली रश्मी देसाई, सुंदरता पाहून नजरच हटणार नाही

‘त्या व्यक्तीला जिवंत जाळले गेले, तेव्हा तर…’, उदयपूर हत्याकांडावर स्वरा भास्करने केले मोठे वक्तव्य

लग्नाच्या आधी सेक्स आणि प्रेग्नंसीवर दियाचे बेधडक वक्तव्य; म्हणाली, ‘हे सगळ्यांनाच जमत नाही…’

हे देखील वाचा