Saturday, June 29, 2024

लाल महालात जिजाऊंच्या फोटोसमोर चंद्रमुखीच्या गाण्यावर लावणी डान्स करुन रिल्स बनवले, तिघांवर गुन्हा दाखल

आजकाल रिल्सचा जमाना आला आहे. सोशल मीडियावरील हे प्लॅटफॉर्म अनेकांसाठी वरदान ठरले आहे. अनेकांना या प्लॅटफॉर्मवरून काम मिळाले आहे, गायन, नृत्य किंवा इतर काहीही असो ते जिथे जाईल तिथे त्यांची कला सादर करत असतात. त्यातल्या त्यात रिल्स स्टार या बाबत खूपच सक्रिय असतात. नुकतेच प्रदर्शित झालेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट खूप गाजत आहे. यातील ‘चंद्रा’ या गाण्याने तर सगळ्या तरुणींना वेड लावले आहे. अनेक जणी या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. अशातच डान्सर वैष्णवी पाटील हिने असे काही केले आहे ज्याबात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी पाटीलने पुण्यातील लाल महालात जाऊन ‘चंद्रा’ या गाण्यावर रील तयार केले आहे. रिल्स तयार करणं ही चुकीची गोष्ट नाही, तर ती रील तिने माता जिजाउ यांच्या फोटो समोर केल्याने तिच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लाल महालात लावणीवर नाचून रिल्स बनवल्या प्रकरणी तीन जणांविरोधात फसारखान पोलिस स्टेशन (पुणे) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदिप बापट, केदार अवसरे आणि वैष्णवी पाटील यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वैष्णवीला तिचे हे रील करणे खूप महागात पडले आहे. यावर अनेक दिग्ग्जनी त्यांची मते मंडळी आहे आणि यावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परंतु आता हे प्रकरण किती पुढे जातंय आणि वैष्णवीला याचा किती भुर्दंड बसतोय हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा