Monday, July 8, 2024

९०च्या दशकातील सुपरहिट शो पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस, ‘वागळे की दुनिया’ आता दिसणार नव्या रूपात

‘वागले की दुनिया’ हा शो 90च्या दशकातील एक सुपरहिट शो होता. आता हा शो पुढच्या आठवड्यात नवीन रंग आणि नव्या ढंगाने प्रेक्षकांच्या भेटीला परत येणार आहे. आरके लक्ष्मण निर्मित आणि कुंदन शाह दिग्दर्शित या सिटकॉमने श्रीनिवास वागळे यांच्या नजरेतून जगाला प्रेक्षकांसमोर मांडले होते. आता तब्बल 33 वर्षानंतर अभिनेत्री भारती आचरेकर पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवर वागले यांची पत्नी राधिका वागळे म्हणून दिसणार आहे. यासाठी त्या खूप उत्साही देखील आहेत. शो चे निर्माते जेडी मजीठिया यांनी ‘वागळे की दुनिया- नई पीढ़ी नये किस्‍से’ या शो साठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्या खूप आश्चर्यचकित झाल्या.

त्या म्हणाल्या की, 1988 मध्ये हा शो पहिल्यांदा प्रसारित झाला होता. तेव्हापासून त्याला आता 33 वर्षे झाली आहेत. जेडीशी बोलताना त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी आधीही जेडीचे काम पाहिले आहे. तसेच, जेडीने केलेले सर्व कार्यक्रम आणि त्यांच्या गुणवत्तेमुळे भारती खूप प्रभावित झाल्या होत्या. म्हणून त्यांना खात्री होती की ते ‘वागळे की दूनिया’ सोबतही काहीतरी चांगले करतील. त्यांनी दाखवलेला हा विश्वास आता मात्र खरा होताना दिसत आहे.

वृद्धानांही आवडेल ‘वागळे की दुनिया’:
‘वागळे की दुनिया- नई पीढ़ी नये किस्‍से‘ मधील वागळे आणि त्यांच्या नात्याविषयी बोलताना भारती आचरेकर म्हणाल्या, ‘काही नाती आणि बॉन्ड कधीच बदलत नाहीत, म्हणून अंजन आणि माझ्यामधील केमिस्ट्री ही तशीच असेल, जशी लोकांना आवडायची. शोमध्ये केवळ एक गोष्ट वेगळी असेल. ती म्हणजे, आता आम्ही म्हातारे झालो आहोत आणि आमच्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत, ज्यामुळे काही गोष्टी नक्कीच बदलतील’. त्यांचे म्हणणे आहे की वृद्धांनाही वागळे आवडतील, कारण या काळात त्यांच्या समस्या बदलल्या आहेत.

नाही बदलणार राधिकाची विचारसरणी:
यानंतर भारती म्हणाल्या की ‘राधिकाची विचारसरणी पूर्वीसारखीच असेल. पण नवरा-बायको यांच्यात पूर्वीपेक्षा थोडा जास्त गदारोळ होईल. परंतु प्रेक्षकांना श्रीमती वागळे यांच्यापेक्षा ज्येष्ठ वागळे यांच्या शैली आणि पध्दतीत थोडेसे फरक जाणवतील’. हे सांगताना त्यांनी असेही आश्वासन दिले आहे की ज्येष्ठ वागळे किंवा कनिष्ठ वागळे आणि त्यांचे कुटुंब यांच्यातील मूल्यांमध्ये कोणताही बदल दिसणार नाही. या नवीन आवृत्तीत फक्त एकच महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे शो मध्ये आता तीन पिढ्या आल्या आहेत.

नवीन कथा दाखवण्याचा होणार प्रयत्न:
प्रेक्षकांना आपला संदेश देताना भारती आचरेकर म्हणाल्या की, ‘ही आजच्या पिढीची कथा असणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याच जुन्या ‘वागले की दुनिया’ ची अपेक्षा करू नये. तो टप्पा चांगला पार झाला होता आणि आता तो परत येणार नाही. म्हणून मी प्रार्थना करते की आजच्या काळात आम्ही ज्या प्रकारे ते सादर करणार आहोत, त्याचा प्रेक्षक आनंद घेतील. शो मध्ये आता नवीन समस्या उद्भवतील आणि त्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी आपल्याला कसे बाहेर पडतो हे दाखवले जाईल. यासोबतच आम्ही या नवीन कथेत सामान्य माणूस आणि त्याच्या कुटुंबासमोरील आव्हाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील वाचा