Tuesday, March 19, 2024

धक्कादायक! सेटवर झाला गोळीबार, चुकून झाडडेल्या गोळीमध्ये सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू

सिनेसृष्टी म्हटलं की, त्याठिकाणी काही ना काही घडतंच असतं. नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुमचेही कान स्तब्ध होतील. अमेरिकन अभिनेता ऍलेक बाल्डविनने शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) न्यू मेक्सिकोमध्ये एका चित्रपटाच्या सेटवर एका महिला सिनेमॅटोग्राफरला गोळ्या घातल्या. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शकही या घटनेत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की, ही घटना सेंटा फे-फिल्मच्या सेटवर घडली. बाल्डविन चित्रपटात मुख्य पात्र साकारत होते. शूटिंग दरम्यान, बाल्डविनने प्रोप गनने गोळीबार केला, ज्यामुळे महिला सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, आतापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  (hollywood actor alec baldwin accidentlly shoot gun cenematographer dead and wounded director)

तसेच ज्या प्रोप गनने गोळीबार झाला, त्यात कोणता दारूगोळा भरला गेला होता, याचा तपास चालू आहे. महत्वाचं म्हणजे याप्रकरणी अभिनेता बाल्डविन, सुजा आणि सेटवरील इतर कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

तर दुसरीकडे मृत्यू झालेल्या सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्सलाला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली दिली जात आहे. हलिन हचिन्सचे सहकारी मित्र जेम्स कलम, जॅक कॅसवेल आणि टीना प्रेस्ली बोरेक यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. हलिन हचिन्स ही एका सैनिक पित्याची मुलगी होती. ती हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक उगवती तारका होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

हे देखील वाचा