Monday, July 1, 2024

‘चित्रपटाचे भविष्य तुम्ही ठरवू शकत नाही…’, म्हणत सीबीएफसी सदस्याने ममता बॅनर्जीच्या विरुद्धात मांडले मत

सध्या ‘द केरळ स्टोरी‘ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटावर वाद इतका वाढला आहे की, तो रिलीज होण्यापासून थांबवण्याची देखील मागणी होत हाेती. अशात सर्व अडचणींवर मात करत ‘द केरळ स्टोरी’ 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, असे असले तरी गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांनी पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात शांतता राखण्याची गरज असल्याचे कारण देत चित्रपटावर बंदी घातली. अशात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या सदस्या वाणी त्रिपाठी यांनी ममता बॅनर्जींच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाणी त्रिपाठी यांनी सीबीएफसीच्या ‘द केरळ स्टोरी’ला रिलीज करण्याची परवानगी मिळाल्यानंतर बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी झालेल्या संवादात त्या म्हणाल्या, “तुम्ही प्रेक्षकांचा लोकशाही अधिकार काढून घेत आहात, जो चित्रपटाचे भवितव्य ठरवेल. तुम्ही ते ठरवू शकत नाही, मी ते ठरवू शकत नाही, इतकेच काय, तर दिग्दर्शकही हे ठरवू शकत नाही. हे प्रेक्षक ठरवेल की, चित्रपट त्यांच्याशी बोलतो की, नाही. दिग्दर्शकाने सांगितलेल्या गोष्टींशी ते जुळतात की, नाही.”

त्या पुढे म्हणाले, “प्रत्येक चित्रपटापासून धक्का बसण्याची गरज नाही, असेही चित्रपट आहेत जे डार्क आहेत, परंतु दिवसाच्या शेवटी, आपण केवळ चित्रपटाला प्रमाणित करू शकतो आणि या देशात प्रमाणपत्र देण्याचा हा एकमेव लोकशाही मार्ग आहे. जर ते देखील अडथळा आणत आहे, तर देव स्वामी आहे.”

‘द केरळ स्टोरी’वर बंगालमध्ये बंदी घालण्याच्या निर्णयावर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ममता बॅनर्जींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून ते म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी हा चित्रपट न पाहता, हा चित्रपट राज्यासाठी धोका आहे हे कसे ठरवू शकतात?, हा चित्रपट न पाहताच हा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोलकात्यातील जनतेला चित्रपट आवडला. रिलीजनंतर चार दिवस थिएटर खचाखच भरले होते.”( cbfc member reacts on mamta banerjee decision to the kerala story ban film in west bengal )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फ्रेंच, ब्रिटिश-अमेरिकन भाषेत अशाप्रकारे बाेलली श्रद्धा कपूर, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

रितेश आणि जिनिलिया यांचा एयरपोर्टवरील ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल, दोघांची नम्रता पाहून नेटकरी देखील झाले खुश

हे देखील वाचा