अंमली पदार्थ नियंत्रणच्या मुंबई विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एक मोठा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. समीर यांच्यावर आर्यन खान अंमली पदार्थ सेवन प्रकरणात शाहरुख खान कडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा सणसनी खेच आरोप करण्यात आला आहे. त्याच अंतर्गत आर्थिक अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआय समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापे मारण्यात आले असून, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत नक्कीच भर पडणार आहे.
CBI (Central Bureau of Investigation) registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede and three others in connection with a corruption case related to the Aryan Khan cruise case. The agency raided 29 locations in Mumbai, Delhi, Ranchi (Jharkhand) and… pic.twitter.com/Dw3CDru57q
— ANI (@ANI) May 12, 2023
मिळणाऱ्या माहितीनुसार सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरी केलेली छापेमारी ही तब्बल १३ तास चाललंय. त्यानंतर सकाळी ५.३० च्या दरम्यान टीम त्यांच्या घरातून काही महतवाची कागदपत्रे आणि प्रिंटर घेऊन गेली. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असलेल्या मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह २९ ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
तत्पूर्वी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. या टाकलेल्या धाडीमध्ये एनसीबीने काही अंमली पदार्थ हस्तगत केले. अंमली पदार्थ प्रकरणात झालेल्या कारवाईमध्ये आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना जेलमध्ये ठेवले होते. मात्र नंतर कोर्टाने पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झोपेतून उठला आणि थेट उर्मिलाच्या प्रेमातच पडला, वाचा उर्मिला आणि आदिनाथ यांची भन्नाट प्रेमकहाणी