मंडळी, बऱ्याचदा आपण अनेक मोठ मोठ्या स्टार्सना अनेक मुलाखतींमध्ये पाहतो, अनेकदा त्यांच्या मुलाखती आपल्याला वाचायला मिळतात. यातून त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाते. पर्यावरणाविषयी, मानवतेविषयी, त्यांची विचारसरणी काय आहे हे आपल्याला कळत जातं. अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या कामाबरोरबच समाजाचंही भान ठेवतात. सतत समाजासाठी आपल्या फावल्या वेळातून काही ना काही करत असतात. अशाच एका सेलिब्रिटी कलाकाराने एक वैचारिक मत व्यक्त केलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा होतेय. या कलाकाराचं नाव आहे रिकी गर्वेस! तो नेमकं असं काय म्हणाला आहे ज्यामुळे ही चर्चा होऊ लागलीये चला पाहुयात.
हॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता रिकी गर्वेस हा आणखी एका गोष्टीविषयी प्रसिद्ध आहे. त्याच प्राणी प्रेम! त्याचं प्राणी प्रेम काही जगापासून लपून राहिलेलं नाही. आजपर्यंत अनेक वेळा त्याने प्राण्यांच्या हक्कांविषयी त्यांच्या अधिकारांविषयी आवाज उठवला आहे. अनेकदा प्राणी शिकारी विरोधात त्याने प्रशासनाला धारेवर धरलं आहे. तो जिथे जातो तिथे तो इतरांना प्राण्यांविषयी, भूतदयेविषयी समजावून सांगतो. काही दिवसांपूर्वी एका टॉक शो दरम्यान त्याने एक वक्तव्य केलं ज्यामुळे हे सिद्ध होतं की तो किती मोठा प्राणीप्रेमी आहे ते!
एका टॉक शोमध्ये बोलताना रिकी म्हणाला की, ‘त्याच्या मृत्यूनंतर त्याला लंडनमधील प्राणी संग्रहालयात वाघांसमोर जेवण म्हणून टाकलं तर त्याला काहीच हरकत नसेल.’ यापुढे तो म्हणाला की, ‘आपण जनावरांना खातो आणि त्यांची घरे तोडतो. कमीत कमी या निमित्ताने का होईना आपण पर्यावरण आणि समाजाला काहीतरी देऊ शकू.’ पुढे रिकीने हेही सांगितलं की, ‘हे बघणं इंटरेस्टींग ठरेल की, जेव्हा प्राणी संग्रहालयात टुरिस्ट हे बघतील की, एका अभिनेत्याचा मृतदेह वाघांसमोर पडला आहे. तेव्हा त्यांचे हावभाव बघण्यासारखे असतील.’
या चॅटशो दरम्यान रिकी आपल्याला मृत्यूसारख्या विषयावर भाष्य करताना पाहायला मिळाला. फक्त रिकीच नाही तर बरेच विनोदवीर आपल्याला हे असं डार्क विषयावर विनोद करताना दिसतात. कारण या सर्व विनोदवीरांचं एक मत असतं की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. लोकांना अशाप्रकारच्या विषयावर विनोदी अंगाने भाष्य केल्यावर आवडतं. प्रत्येक जण अगदी हेच करतो. प्रत्येक विनोदवीर हा मृत्यूवर बोलताना अगदी कुल असतो. कारण एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरण येणार आहे.
रिकी यासोबतच ट्रॉफी हंटिगच्याही विरोधात आहे. त्याने गेल्यावर्षी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, ‘जनावरांना आपल्या मनोरंजनासाठी मारणं, माझ्या दृष्टीने हा मोठा गुन्हा आहे आणि ट्रॉफी हंटिंगसारख्या गोष्टी मानवतेची लाज काढणारी आहे.’ दरम्यान, आफ्रिकन वाइल्डलाईन फाउंडेशननुसार जर ट्रॉफि हंटिंगसारख्या कॉन्सेप्ट्स बंद झाल्या नाही तर २०५० पर्यंत अनेक भागातील वाघांचं अस्तित्व नष्ट होईल.
रिकीने आतापर्यंत द इन्व्हेन्शन ऑफ लाइंग, घोस्ट टाऊन, नाईट ऍट द म्युझिअम, डेव्हिड ब्रेंट, स्पेशल करस्पॉंडंट्स, स्टारडस्ट या सारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.