Friday, July 5, 2024

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बिग बींच्या चाहत्याने केलं ‘अस्सं’ काही, ऐकून तुमच्याही उंचावतील भुवया

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रचंड मोठा चाहतावर्ग कमवला आहे. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. इतकेच नव्हे, तर आपले त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यातही ते मागं पुढं पाहत नाहीत. इतरांप्रमाणे बिग बींचे चाहतेही अनेकदा त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमांमार्फत प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत.

अशातच आज (११ ऑक्टोबर) बिग बी त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने जगभरातून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी भरभरून शुभेच्छा येत आहेत. चाहतेही त्यांना आपल्या खास अंदाजात शुभेच्छा देण्यात कसलीही कसर सोडत नाहीयेत. सध्या अशाच एका चाहत्याने अनोख्या अंदाजात बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (amitabh bachchan birthday fan makes a sand art at mumbai beach)

बिग बींवर शुभेच्छाचा वर्षाव रात्री उशीरा १२ वाजल्यापासूनच सुरू झाला होता. त्यांचे अनेक चाहते एकत्र येऊन, त्यांनी अभिनेत्याच्या घराच्या बाहेर केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. या सर्वांमध्ये सर्वात चर्चेत आला तो चाहता, ज्याने आपल्या चहित्या अभिनेत्यासाठी बीचवर वाळूची कलाकृती (sand art) बनवली. होय! बिग बींच्या एका चाहत्याने बीचवर चक्क त्यांच्या चेहऱ्याची कलाकृती बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अखेरच्या वेळेस ते ‘चेहरे’ चित्रपटात दिसले होते. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. शिवाय, आगामी काळात अमिताभ ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘मेडे’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. आजकाल बिग बी ‘केबीसी १३’ होस्ट करत आहेत आणि प्रेक्षकांकडूनही या शोला खूप पसंती मिळत आहे.

शिवाय अमिताभ सोशल मीडियावरही बरेच सक्रिय राहतात. यामार्फत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये अनेकदा त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्याला त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा