Monday, July 1, 2024

कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?

सामान्य लोकांना कलाकारांबद्दल आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमीच आकर्षण असतं. कलाकार आणि त्यांच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांच्या काही विचित्र सवयी आणि छंद याबद्दल सांगणार आहोत.

जाणून घेऊया कलाकारांच्या अशाच काही आगळ्या वेगळ्या सवयींबददल;

शाहरुख खान :
बॉलीवूडचा किंग खान असे बिरुद मिळवलेला शाहरुख सुद्धा एका विचित्र सवयीसाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. त्याची ती विचित्र सवय म्हणजे, त्याला कायम बूटात राहणं आवडत. जर शाहरूखला बूट घालून झोपण्याची वेळ आली तर तो कोणतीही तक्रार न करता बूट घालूनच झोपतो, किंबहुना तो कधी कधी बूट घालून झोपत सुद्धा असतो.

सलमान खान :
दबंग खान अर्थात बॉलीवूडचा भाईजान हा अतिशय लोकप्रिय कलाकार आहे. सलमान आणि हिट असे समीकरण मागच्या काही काळात तयार झाले आहे. याच सलमान वेगवेगळ्या प्रकारचे साबण जमा करण्याचा छंद आहे. तो जिथे जाईल तिथून साबण खरेदी करत असतो. हॅन्डमेड साबणापासून ते हर्बल साबणापर्यंत असंख्य साबणाचे सलमान कडे कलेक्शन आहे. विविध सुवास, आकार असलेले साबण देखील तो जमा करतो.

जितेंद्र :
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते म्हणजे ‘जितेंद्र’. त्यांनी अनेक काळ बॉलीवूड गाजवले आणि रसिकांचे मनोरंजन केले. अशा या महान कलाकाराला देखील एक विचित्र सवय आहे. ती म्हणजे जितेंद्र टॉयलेट ला जाताना सोबत फळं घेऊन जातात आणि पॉटवर बसून फळं खातात. आहे ना विचित्र आणि वेगळी सवय.

करीना कपूर-खान :
‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी, सैफची बेगम, तैमूरची आई बॉलीवूड मधील स्टायलिस्ट आणि दमदार अभिनेत्री म्हणून करीना ओळखली जाते. अशा या कुल मॉम ला लहान मुलांसारखीच एक विचित्र सवय आहे आणि ती म्हणजे, नखे खाण्याची. हो, करीना बसल्या बसल्या आपली नखे खात असते. अनेक कार्यक्रमांच्या वेळी तिला नखे खाताना बघितले गेले आहे.

सुष्मिता सेन :
आपल्या फिटनेस साठी आणि तिच्या खाजगी आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. ‘मिस युनिव्हर्स’चा ताज मिळवल्यानंतर सुश्मिताने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले. अशा या सौंदर्यवतीला सुद्धा एक विचित्र सवय आहे, सुष्मिताला चार भिंतीमध्ये कधीच अंघोळ करायला आवडत नाही. तिला उघड्या जागी अंघोळ करायला आवडते. असं सांगण्यात येत की, तिची हि सवय लक्षात घेऊनच तिच्या घरी टेरेसवर एक बाथटब तयार केला आहे. जेणेकरून सुश्मिता तिथे आनंदाने अंघोळ करू शकते.

शाहिद कपूर :
असंख्य तरुणींचा लाडका हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध अशा शाहिद कपूरला देखील एका गोष्टीचे व्यसन आहे.
व्यसन म्हटल्यावर तुम्हाला दारू, सिगरेट वाटेल पण थांबा शाहिदला यातले कुठलेच नाही एका वेगळ्याच गोष्टीचे व्यसन आहे. त्याला कॉफी पिण्याचे व्यसन आहे. हो शाहिद जास्त वेळ कॉफी न पिता राहूच शकत नाही. हे खुद्द शाहीदनेच एका मुलाखती दरम्यान काबुल केले आहे.

जॉन अब्राहम :
ऍक्शन हिरो, आणि बाईक प्रेमी म्हणून जॉन प्रसिद्ध आहे. त्याला देखील एक सवय आहे आणि ती म्हणजे, तो सतत पाय हलवत असतो. त्याला खूप लोकांनी या सवय बद्दल टोकले होते मात्र, तरीही त्याची ही सवय काही गेली नाही.

सनी लियोनी :
बोल्ड आणि ब्युटीफुल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सनी लियोनी. खूप कमी वेळात सनीने तिचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. याच सनीला सतत पाय धुवायची सवय आहे. दार थोड्यावेळात सनी तिचे पाय धूत असते.

सैफ अली खान :
पतौडी घराण्याचा नवाब आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून सैफ ओळखला जातो. या सैफलाच वाचनाची प्रचंड आवड आहे. त्याची ही आवड लक्षात घेऊन सैफने त्याच्या घराच्या बाथरूम मध्ये एक छोटे वाचनालय बनवले आहे.

विद्या बालन :
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. आजच्या काळात मोबाईल सर्वांचे विश्व झाले आहे. एक मिनिटही कोणी मोबाइल पासून दूर राहू शकत नाही. मात्र विद्याला मोबाइल जवळ बाळगलेला बिलकुल आवडत नाही.

हेही वाचणं आहे महत्त्वाचं
बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ
ब्रेकअप, घटस्फोट आणि पुन्हा लग्न, बॉलिवूडकरांची नात्यांची खिचडी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या हटके लव्ह स्टोरी, कमी वयाच्या नायकांसोबत बांधली लगीनगाठ    
कलाकार आणि त्यांच्या अजब सवयी; वाचून तुम्ही ही म्हणाल असं कुठं असतं का?

हे देखील वाचा