Friday, July 12, 2024

जेव्हा कलाकारांच्या तिरसट स्वभावामुळे त्यांचे वाद आले होते चव्हाट्यावर, पाहा तुमचा आवडता कलाकार आहे का यादीत

वाद आणि कलाकार यांचे जवळचे नाते आहे. सलमान खानपासून ते आमिर खापर्यंत अनेक कलाकार विवादित वक्तव्य करून बातम्यांमध्ये झळकत राहिलेत. पाहूयात अशाच काही कलाकारांची नावे आणि त्याचे विवादित विधान.

बॉलीवूडमधील कलाकार हे जसे त्यांच्या अभिनयासाठी, चित्रपटांसाठी चर्चेत असतात, तसेच त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी देखील ते अनेकवेळा चर्चेत येऊन वाद ओढवून घेतात. आमिर पासून सलमान पर्यंत आणि करीनापासून दीपिकापर्यंत सर्वच कलाकार आपल्या चुकीच्या विधानांमुळे लाइमलाईट्मधे तर आलेत. मात्र, त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागलाय.

आमिर खान :

आमिर खान आणि शाहरुख खान यांचा वाद हा जगजाहीर आहे. त्यातच आमिर खान याने काही वर्षांपूर्वी ‘मी माझ्या कुत्र्याचे नाव शाहरुख ठेवले आहे’ असे विधान केला होते, त्यानंतर आमिरला ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला.

कंगना राणावत :

वाद आणि कंगना यांचे समीकरणच झाले असून, विवादित विधाने ही जणू कंगनाची नवीन ओळख बनली आहे. त्यातच कंगनाने उर्मिलावर टीका करताना तिला एक सॉफ्ट पॉर्नस्टार सांगितले. तिच्या या विधानामुळे चहुबाजुंनी कंगनावर टीकेची झोड झाली. सुशांतच्या मृत्यू नंतर बॉलीवूडची खराब होत असलेली प्रतिमा पाहून तिने ‘एकामुळे पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणे योग्य नाही’ असे विधान तिने संसदेत केल्यानंतर तिच्यावर कंगनाने हे विवादित विधान केले.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये करणने कंगनाला ‘जर तुझ्यावर बायोपिक झाली तर त्यात तू कोणाला कोणता रोल देशील? यावर तिने माझ्या बायोपिक मध्ये मी तुला एक चित्रपट माफियांच्या भूमिकेत दाखवेल.

सोनम कपूर :

सोनम कपूरने करणच्या ‘कॉफी विथ करण’ मध्ये आपल्या एक्स ब्वॉयफ्रेंड रणबीर कपूर बद्दल बोलताना, रणबीर मादक नसून तो फक्त त्याच्या आईच्या पदरात राहणार मुलगा असल्याचे सांगितले होते.

दीपिका पदुकोण :

दीपिकाने देखील करणच्या ‘कॉफी विथ करण’ मध्ये तिच्या एक्स ब्वॉयफ्रेंड असलेल्या रणबीर कपूर बद्दल तिने एक धक्कादायक वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती, ‘मी रणबीरला मी कॉन्डोम भेट म्हणून देऊ इच्छेते’. कारण त्याला त्याची खूप गरज आहे.

महेश भट्ट :

महेश भट्ट यांचा तर विधांसोबतच फोटो देखील गाजला. फिल्म मेकर महेश भट्ट यांचा एका चित्रपट मासिकाच्या मुखपृष्ठावर पूजा भट्ट आणि त्यांचा लिपलॉक करतानाच्या फोटोवरून खूप गदारोळ झाला. त्यावेळेस ते म्हणाले होते की, ‘पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्यासोबत लग्न केले असते.’ या वक्तrव्यामुळे महेश खूप चर्चांमध्ये आले होते.

प्रियंका चोप्रा :

प्रियंका आणि करीना या दोघींचे संबंध ठीक नाही हे तर सर्वश्रुत आहे. प्रियांकाच्या ‘फॅशन’ सिनेमांनंतर ग्लॅमर क्षेत्रावर आधारित करीनाच्या ‘हिरोइन’ या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी करीनाने ‘हिरोइन’ हा सिनेमा ‘फॅशन’ पेक्षा अधिक चांगला आहे असे सांगितले होते. त्यावर प्रियंकाने ‘करिनाजवळ राष्ट्रीय पुरस्कार नसल्याने, तिला दुरून द्राक्ष आंबट वाटत आहे. असे म्हटले होते.

जया बच्चन :

शाहरुखने एकदा ऐश्वर्या बद्दल एक चुकीचे विधान केले होते. त्यावर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, शाहरुख माझ्या समोर असे काही बोलला असता तर मी त्याला चापट मारली असती. असे त्या म्हणाल्या होत्या.

विवेक ओबेरॉय :

विवेकने मागच्या वर्षी २०१९च्या लोकसभा मतदानाच्या मतमोजणी दरम्यान एक फोटो शेयर केला होता. त्या फोटोची ऐश्वर्या सोबत तुलना करत सलमानला ओपिनियन पोल, स्वतःला एक्जिट पोल आणि अभिषेकला निकाल असे दाखवले होते. त्यानंतर त्याला खूप टीका सहन करावी लागली मग त्याने ते ट्विट काढून टाकले होते.

अधिक वाचा

जेव्हा कपिल शर्मा त्याच्याच विद्यार्थ्यावर करत होता प्रेम, तेव्हा अशी फुलली प्रेमकथा

जेव्हा कृष्णा अभिषेकच्या जन्मासाठी गोविंदाने केला होता नवस, जाणून घ्या ‘तो’ रंजक किस्सा

हे देखील वाचा