Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रींनी लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच दिली गुड न्यूज

‘या’ अभिनेत्रींनी लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच दिली गुड न्यूज

काही दिवसांपूर्वीच आलिया भट (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर( Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. अगदी त्यांच्या लग्नाच्या तयारीपासून लग्नापर्यंत अनेक बातम्या आल्या. तसंही आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील एवढे मोठे स्टार म्हटल्यावर त्यांच्या लग्नाच्या चर्चा तर होणारच ना. पण आता लग्नाला दोन महिने होतात न होतात त्यांनी चक्क गुडन्यूज दिलीये. २४ एप्रिलला लग्नगाठ बांधलेले आलिया आणि रणबीर यांनी २७ जूनला जाहीरही केलंय की ते येत्या काही महिन्यात आई-बाबा होणारेत, याच बातमीने खरंतर अनेकजण आश्चर्यचकीत झालेत. कसंय अनेकदा नवीन लग्न झालेली जोडपी पालक होण्यासाठी जरा वेळ घेतात. त्याचमुळे लग्नाच्या दोन महिन्यातच बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी देणाऱ्या आलिया – रणबीर बाबत जरा आश्चर्य व्यक्त होतंय. पण मंडळी ही काही पहिली अशी सेलिब्रेटी जोडी नाही बरं का जी लग्नाच्या वर्षाच्या आतच आई-बाबा होणारेत. यापूर्वीही आशा काही जोड्या आहेत, ज्यांनी लग्नाच्या काही महिन्यातच गुडन्यूज दिलेली. कोण आहेत असे सेलिब्रेटी चला नजर टाकूया.

पहिलं नाव म्हणजे हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविच. सध्या भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविच बरेच चर्चेत असतात. हे दोघं बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी १ जानेवारी २०२० रोजी साखरपूडाही केला होता. रिपोर्ट्सनुसार त्यांनी मे २०२०मध्ये लग्नही केले. पण त्यानंतर लगेचच त्यांनी पालक होणार असल्याचे जाहीर केले आणि जुलै २०२०मध्ये नताशाने मुलाला जन्मही दिला होता. काही महिन्यातच हार्दिक आणि नताशाच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले.

या यादीतील दुसरं नाव म्हणजे नेहा धुपिया आणि अंगद बेदी. अभिनय क्षेत्रातील हे नेहमीच चर्चेत असलेले जोडपे आहे. त्यांनी २०१८ मध्ये लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. लग्नाच्या तीन महिन्यातच त्यांनी आई-बाबा होणार असल्याचंही सांगितलेलं. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना मुलगी झाली. तसेच २०२१ मध्ये नेहाने त्यांच्या मुलालाही जन्म दिला.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. पण लग्नाच्या काही दिवसातच मालदिवला हनिमूनला गेलेले असतानाच त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मे महिन्यात त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. त्यांच बाळ प्री-मॅच्यूअर बेबी होतं. त्यामुळे त्यांनी त्याच्या जन्माबद्दल २ महिन्यांनंतर माहिती दिलेली. आता दिया त्यांच्या मुलाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

टेलिव्हिजनवरील जानामाना चेहरा असलेल्या शाहिर शेखने त्याची गर्लफ्रेंड रुचिका कपूरबरोबर १९ ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केले होते. त्यानंतर लग्नाच्या काही महिन्यातच त्यांनीही गुडन्यूज दिली आणि ९ सप्टेबर २०२१ मध्ये त्यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले. अनेकदा त्यांच्या मुलीबरोबरचे फोटो शाहिर सोशल मीडियावर शेअर करत असतो.

विनोदाने अनेकांना खळखळून हसवणारा कलाकार म्हणजे कपिल शर्मा. त्याने डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी चत्राथबरोबर लग्नगाठ बांधली होती. या दोघांना लग्नाच्या बरोबर एक वर्षाने म्हणजेच डिसेंबर २०१९ मध्ये कन्यारन्त प्राप्त झालेले. यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये या जोडप्याने त्यांच्या मुलालाही जन्म दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा