प्रत्येकाला आपली जीवनशैली उत्कृष्ट ठेऊन, आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहावं असं वाटतं असतं. यासाठी योगा आपल्याला मदत करतं. योगाचे हेच महत्व लक्षात घेऊन आज काल सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीज पर्यंत सर्वच योगा करतात. बॉलीवूडच्या अभिनेत्री तर त्यांच्या प्रेग्नेंसी दरम्यान सुद्धा योगा करत आहेत.
नुकताच अनुष्का शर्माने प्रेग्नेंसी मध्ये शीर्षासन करतं असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेग्नेंसी मध्ये देखील योगा सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगितले.

आज आपण बॉलीवूडच्या अशाच काही अभिनेत्रीची माहिती घेणार आहोत ज्यांनी प्रेग्नेंसी मध्ये देखील योग केला आहे.
करीना कपूर खान-
लवकरच करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही बातमी तिने सांगितल्यानंतर काही दिवसातच तिने सोशल मीडियावर जिम मधला एक फोटो शेयर करत तिने लिहले ‘ट्रेडमिल वर पाळायला नकार देणे हे रेजिस्टेंस ट्रेनिंग आहे का? करीना पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळेसही योग आणि व्यायाम करत होती. नुसते प्रेग्नेंसी मध्ये नाही तर इतरवेळेला देखील ती व्यायाम करत असते.
एमी जैक्सन-
‘सिंग इस ब्लिंग’, एक दिवाना था’ अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे एमी जॅक्सन. एमी ने देखील तिच्या प्रेग्नेंसी काळात बेबी बम्प सोबत योग केला आहे. योग करताना एमी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायची. प्रेग्नेंसीच्या काळात हृदय, डोकं आणि शरीराला फ्रेश ठेवण्यासाठी योग महत्वाचा आहे.
सोहा अली खान-
२०१७ साली आई झालेल्या सोहाने प्रेग्नेंसीच्या काळात फिट राहण्यासाठी योगाची मदत घेतली. शरीराला प्रेग्नेंसी साठी तयार करायला योग मदत करते असे सांगत तिने प्रेग्नेंसीच्या ९ व्या महिन्यातही योग केला. तिचे योग करताना अनेक फोटो वायरल झाले होते.
लारा दत्ता-
लाराने २०१२ साली तिच्या आणि महेश भूपतीच्या मुलीला जन्म दिला. लाराने प्रेग्नेंट असलेल्या महिलांना आवश्यक असे योग प्रकार करत त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिने सुद्धा प्रेग्नेंसी मध्ये योगाला खूप महत्व दिले.
शिल्पा शेट्टी-
बॉलीवूड मधील फिट असणाऱ्या अभिनेत्रींपैकी शिल्पा एक अभिनेत्री आहे. ती नेहमीच स्वतःला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी योगा करते. तिने देखील तिच्या प्रेग्नेंसीच्या काळात आणि प्रेग्नेंसी नंतरही स्वतःला नीट ठेवण्यासाठी योगा केला.
समीरा रेड्डी-
प्रेग्नेंसीच्या काळात समीराने प्रेग्नेंट महिला उपयोगी पडतील असे अनेक व्हिडिओ आणि योगाचे प्रकार शेयर केले. योगामुळे शरीर संतुलित राहून प्रेग्नेंसी दरम्यान आणि प्रेग्नेंसी नंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर योग उत्तम इलाज आहे.