Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

चिमुकल्यांच्या आगमनामुळे ‘या’ सेलिब्रिटींच्या घरात यावर्षी दिवाळीचे सेलिब्रेशन होणार डबल

दिवाळीचा सण दरवर्षी खूप आनंद घेऊन येतो. मनोरंजन क्षेत्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळी खास असली, तरी यंदाची दिवाळी अनेक सेलिब्रिटींसाठी दुप्पट आनंद घेऊन आली आहे. २०२१ च्या दिवाळीपूर्वी त्यांच्या घरी एका गोंडस पाहुण्याने दार ठोठावले आहे. आता हे गोंडस चिमुकले यावर्षी त्यांची पहिली दिवाळी साजरी करतील.

करीना कपूर-सैफ अली खान

करीना कपूरचा धाकटा मुलगा जेहची ही पहिलीच दिवाळी आहे. तैमूरलाही यंदा भावासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही मुलांसोबत सैफिनाचे दिवाळी सेलिब्रेशन शानदार असणार आहे.

चारू असोपा-राजीव सेन

‘मेरे अंगने में’ फेम चारू असोपा नुकतीच आई झाली आहे. या जोडप्याच्या घरी एका छोट्या पाहुणीने जन्म घेतला आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी आलेल्या या गोंडस राजकुमारीने आनंदाची भेट आणली आहे. आपल्या मुलीसोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करताना हे दाम्पत्य खूप आनंदी आहे. चारूच्या मुलीचा जन्म १ नोव्हेंबर रोजी झाला.

किश्वर मर्चंट-सुयश राय

प्रसिद्ध टीव्ही जोडपे सुयश राय आणि किश्वर मर्चंट यांच्या घरी ऑगस्टमध्ये छोट्या राजकुमारचा जन्म झाला. या जोडप्याचे मुलावर खूप प्रेम आहे. दोघांनीही मुलाचे नाव गोंदवले आहे. आता हे जोडपे आपल्या मुलासोबत पहिली दिवाळी कशी साजरी करतात याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

कपिल शर्मा-गिन्नी चतरथ

कपिल शर्मा आणि गिन्नी यावर्षी दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. त्यांचा मुलगा त्रिहान याच्या आगमनाने या जोडप्याच्या दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये रंगत येणार आहे. कपिलच्या मुलीचे नाव अनायरा आहे. या दिवाळीत अनायरालाही भाऊ मिळाला आहे.

शाहीर शेख – रुचिका कपूर

शाहीर शेख आणि त्याची पत्नी रुचिका यांच्यासाठी दिवाळी खास असेल. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या छोट्या मुलाची ही पहिलीच दिवाळी आहे. दुसरे म्हणजे, पती-पत्नी म्हणून या जोडप्याची ही पहिलीच दिवाळी असेल.

नकुल मेहता-जानकी पारेख

‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेता नकुल मेहतासाठी ही दिवाळी खास असणार आहे. त्यांची पत्नी जानकी पारेख यांनी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सुफीला जन्म दिला. सूफी जन्मताच सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत. सूफीच्या क्यूटनेसने भरलेल्या फोटोंनी चाहत्यांना त्यांचे चाहते बनवले आहे.

अनिता हसनंदानी-रोहित रेड्डी

’नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचा पती रोहित रेड्डी हे पॉवर कपल मानले जाते. दोघेही त्यांचा मुलगा आरवसोबत पहिल्यांदाच दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. आरवच्या आगमनाने दाम्पत्य जीवनातील आनंद द्विगुणित झाला आहे.

अनिरुद्ध दवे-शुभू आहुजा

मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडलेल्या अनिरुद्ध दवेला आपल्या मुलासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे. कोरोनामुळे त्याची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांच्या उपचारांचा आणि प्रार्थनेचा परिणाम असा झाला की, अनिरुद्ध कोरोनावर मात करू शकला.

नेहा धुपिया-अंगद बेदी

नेहा आणि अंगद दुसऱ्यांदा आई-वडिल बनले आहेत. मुलगी मेहरला आता लहान भाऊ मिळाला आहे. नेहा यंदाची दिवाळी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत साजरी करणार आहे.

करणवीर बोहरा-टीजे सिद्धू

करणवीर आणि टीजे दुसऱ्यांदा आई-वडिल बनले आहेत. आधीच दोन जुळ्या मुलींचा पालक असलेला करणवीर दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याला एक मुलगी आहे. तिन्ही मुलींसोबत करणवीरचं दिवाळी सेलिब्रेशन खास असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा