Monday, July 1, 2024

करिअर पिकवर असताना ‘या’ भारतीय कलाकारांनी केली आत्महत्या, वाचा संपूर्ण यादी

मंडळी जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये अशी आयुष्याबद्दल खुप काही सांगून जाणारी वाक्य नेहमीच ऐकतो नाही का. पण तरीही कधी परिस्थिती, कधी मानसिकता किंवा कधी काही अन्य कारणांमुळे काही जण इतके वैतागतात की, आपलं आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतात. बरं असा काही निर्णय घेणारे फक्त सामान्य लोकच दिसतात असं नाही आजपर्यंत अनेक सेलिब्रेटिंनीही असाच निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील जवळपास ४ अभिनेत्रींनी केवळ १५ दिवसांच्या आत आत्महत्या केली होती. इतकंच नाही तर २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने सर्वांना धक्का दिला होता. मुंबईतील घरात तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याच्या निधनामागील कारणाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या. खरंतर सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आत्महात्या केली आहे.

५० आणि ६० च्या दशकात अनेक चित्रपटात झळकलेले अभिनेते गुरुदत्त हे एक उत्तम कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी प्यासा, कागज के फुल आशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच खरं नाव होतं वसंत कुमाक शिवशंकर पदुकोण. पण त्यांना गुरुदत्त म्हणूनच मोठी ओळख मिळाली. मात्र, १९६४ साली १० ऑक्टोबर रोजी गुरुदत्त हे मुंबईतील घरात मृत अवस्थेत सापडले. त्यांचा मृत्यू अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या दारूबरोबर घेतल्याने झाला होता. त्यामुळे हे प्रकरण एकतर आत्महत्या असल्याचे म्हटले गेले किंवा त्यांच्या नकळत त्यांनी झोपेच्या गोळ्या आणि दारू एकत्र घेतले असावे असेही म्हटले गेले. पण तरीही ही आत्महत्याच असावी असे अनेकांचे म्हणणे होते कारण गुरुदत्त यांनी यापूर्वीही २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेला.

साल २०१३ मध्ये झिया खान आत्महत्या प्रकरणाचीही खूप चर्चा झालेली. तिने निशब्द, गजनी आशा चित्रपटांमध्ये कामही केले होते. पण ती ३ जून २०१३ रोजी मुंबईतील जुहू येथे तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. तिच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्येही तिच्या प्रेग्नंसी बद्दल काही गोष्टी समोर आलेल्या. ती सुरज पंचोलीबरोबर रिलेशनशीपमध्ये होती. त्याचमुळे तिच्या आईने सुरज पंचोलीवर झियाच्या खूनाचा आरोप केला होता. सुरज पंचोलीची याबाबत ताब्यात घेऊन चौकशीही करण्यात आलेली.

बालिकावधू मालिकेतून आनंदी म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रत्युषा बॅनर्जी. पण तिनेही वयाच्या २४ व्या वर्षी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला. असं सांगितलं जातं की राहुल राज सिंग बरोबरील रिलेशनशीपमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे तिने हा निर्णय घेतलेला. प्रत्युषाने बालवधू व्यतिरिक्तही अनेक मालिकांमध्ये काम केलेलं.

कुशल पंजाबी या अभिनेत्याचं नावही यात येतं. तो मानसिक नैराश्याचा सामना करत होता. अनेक रिपोर्ट्सनुसार तो आणि त्याची पत्नी वेगळे राहात होते त्याचा मुलगा त्याच्या पत्नीबरोबर राहात होता. तो त्याच्या मुलाला अनेकदा मिसही करायचा. कुशलने २६ डिसेंबर २०१९ रोजी आत्महत्या केली. त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या पालकांच्या आणि मुलाच्या नावावर पॉपर्टी करण्यासही सांगितले होते. कुशलने लक्ष्य. सलामे इश्क यांसारख्या चित्रपटांत काम केलेलं.

क्राईम पेट्रोल फेम प्रेक्षा मेहता हिनेही २०२० मध्ये इंदोर येथील तिच्या घरी गळफास लावून स्वत:चे जीवन संपवले होते. तिच्या सुसाईड नोटनुसार करियर आणि रिलेशनशीपमधील अपयश यांच्यामुळे ती निराश होती. अभिनेत्री कुलजीत रांधवा हिनेही ८ फेब्रुवारी २००६ रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. तीने तिच्या सुसाईडनोटमध्ये सांगितलेलं की ती तिच्या आयुष्यातील प्रेशर हँडल करण्या असमर्थ ठरत आहे. धक्कादायक म्हणजे १९९७ साली फेमिना मिस इंडिया युनिवर्स ठरलेली नफिसा जोसेफ हिनेही वयाच्या २६ व्या वर्षी जीवन संपवले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

जेव्हा ‘रिक्षावाला हिरो व्हायला आलाय’ म्हणत अभिनेता धनुषचा केला होता अपमान, वाचा रंजक किस्सा

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिलाषा जाणार मालिकेतून बाहेर? अभिनेत्रीच्या पोस्टने टाकलं गोंधळात

डॉक्टरांनी आशा सोडलेल्या, सुनील दत्त यांचा नर्गिसवरील प्रेमावर होता विश्वास

हे देखील वाचा