भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पाठोपाठ आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. आश्चर्यचकित होऊ नका, अनुष्का ३ वर्षांनंतर पुनरागमन आणि ओटीटी पदार्पण करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अनुष्काच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘चकदा एक्सप्रेस’ आहे, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘चकदा एक्सप्रेस’ हा बायोपिक आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिच्यावर आधारित आहे. अनुष्का (Anushka Sharma) ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी ‘चकदा एक्सप्रेस’चा एक टीझर व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये अनुष्काचा फर्स्ट लूक दिसत आहे.
या टीझर व्हिडिओची सुरुवात क्रिकेटच्या मैदानापासून होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. महिला क्रिकेट संघाकडे स्वत:ची जर्सीही नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचवेळी, लोकांना महिला क्रिकेटमध्ये रस नाही, यामुळे मैदान पूर्णपणे रिकामे आहे.
चित्रपट दिग्दर्शक
झुलन गोस्वामीच्या भूमिकेत अनुष्का म्हणते की, “जेव्हा स्वतःच्या नावाची जर्सी नाही, तेव्हा चाहते कोणत्या नावाने फॉलो करतील, पण काळजी करू नका जर तुम्ही आज जर्सीवर तुमचे नाव काढले, तर उद्या तुम्ही तुमची ओळख देखील बनवाल.” ‘चकदा एक्सप्रेस’चे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले आहे. कर्णेश शर्मा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ही कथा अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिली आहे. अनुष्काने यापूर्वी प्रोसित रॉयसोबत ‘परी’ चित्रपटात काम केले आहे.
अनुष्कासाठी हा चित्रपट महत्त्वाचा का आहे?
अनुष्काने तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारी एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. ‘चकडा एक्सप्रेस’ हा तिच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट का आहे, हे तिने स्पष्ट केले आहे. अनुष्का म्हणाली की, “ही कथा त्यागाची कथा आहे. झुलन गोस्वामी यांचे जीवन सर्वांना प्रेरणा देते. ‘चकडा एक्सप्रेस’मध्ये माजी महिला क्रिकेट कर्णधाराची आवड आणि संघर्ष दाखवण्यात येणार आहे.”
कोण आहे झुलन गोस्वामी
झुलन गोस्वामी हे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव आहे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे आणि भारताची सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखली जाते. आता झुलनने निवृत्ती घेतली आहे. पण तिने सर्व विक्रम मागे टाकले आहेत की, ते मोडणे जगभरातील खेळाडूंना कठीण जाईल.
अनुष्का शर्माने अफवांना दिला पूर्णविराम
झूलन गोस्वामीच्या बायोपिकवर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. पण अभिनेत्रीच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. काही काळापूर्वी अनुष्का शर्माने ‘चकडा एक्स्प्रेस’ सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांची जागा ‘बुलबुल’ फेम तृप्ती डिमरी हिने घेतली आहे. आता सर्व अफवांना पूर्णविराम देत अनुष्का शर्माने २०२२ सालातील मोठ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
हेही वाचा :
शिवानी बावकरने धरला ‘मेरा यार’ स्टेप्सवर ठेका, स्टाईलिश लूकने घातली चाहत्यांना भुरळ
बिग बॉस १५: देवोलीना भट्टाचार्जीच्या मते तेजस्वी प्रकाश आहे अस्वच्छ, म्हणाली ‘ती ब्रशशिवाय…’
फरहान अन शिबानी यांची मार्चमधील लग्नाची तारीख पुन्हा रद्द, ‘या’ खास प्रसंगी घेणार सात फेरे