Saturday, June 29, 2024

चला हवा येऊ द्या मधून ‘या’ प्रसिद्ध विनोदवीराने घेतली एक्सिट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मराठी टेलिव्हिजनविश्वातील सर्वात गाजणार आणि तुफान लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून चला हवा येऊ द्या ओळखले जाते. या शोने त्यांचे एक वेगळेच गारुड प्रेक्षकांवर घातले आहे. या शोची भुरळ केवळ मराठी प्रेक्षक नाही तर हिंदी प्रेक्षक आणि हिंदीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या शोमध्ये आतपर्यंत शाहरुख खान, सलमान खान, आमिर खानपासून रणवीर सिंग, रोहित शेट्टीपर्यंत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले आहेत. या शोमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, कुशल बद्रिके आदी अनेक कलाकार त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवण्याचा काम करतात. या शोने आणि यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने त्यांची एक वेगळी ओळख आणि एक वेगळी छाप प्रेक्षकांवर पडली आहे.

सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक आता या शोला घेऊन एक बातमी समोर येत आहे. या शोमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराने हा शो सोडल्याचे सांगितले जात आहे. विनोदाच्या शोमध्ये हा कलाकार त्याच्या पत्राने भावुक करणारा क्षण घेऊन येत सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करायचा. बरोबर अभिनेता सागर कारंडेने हा शो सोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजूनपर्यंत या बातमीला दुजोरा मिळालेला नसून, त्याने खरंच हा शो सोडला की नाही याबाबत अजूनही शंका आहे. मागील अनेक दिवसांपासून सागर शोमध्ये दिसला नसल्याने आणि नुकत्याच एका भागात पोस्टमनच्या भूमिकेत श्रेयाला पाहून अनेकांनी आता सागरने शो सोडल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saagar Karande ???? (@saagarkarande)

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे हा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर येत त्यांना खळखळून हसवण्याचा काम करायचा. मात्र त्याने साकारलेला ‘पोस्टमन काका’ खूपच भाव खाऊन गेला. या भूमिकेत त्याने आणलेली सहजता, निष्पापपणा, साधेपणा, निरागसता प्रेक्षकांच्या मनाला भिडली.

सागरच्या या पात्राला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. या पात्राच्या माध्यमातून हसता-हसता डोळ्यांत अंजन घालण्याचे काम त्याने केले. पण गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे शो मधेच दिसत नसल्याने, ‘पोस्टमन’ ही भूमिका अभिनेत्री श्रेया बुगडे साकारली होती. तिला या भूमिकेत पाहून प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. आणि तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्रोल देखील केले. आता सर्वच प्रेक्षकांना सागर कारंडेने खरंच शो सोडला आहे की नाही हे त्याच्याकडूनच ऐकायचे आहे.

 

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ

हे देखील वाचा