सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’. पठाण सिनेमाने प्रदर्शित होताच बक्कळ कमाई केली असून, त्याची ही यशस्वी घोडदौड अजून चालूच आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे संपूर्ण जगभरात प्रचंड चाहते आहेत. चार वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेल्या शाहरुखला पुन्हा पठाणच्या निमित्ताने पाहणे सगळ्यांसाठीच एक पर्वणी होती किंबहुना आहे. मराठी सिनेविश्वात देखील शाहरुखचे असंख्य चाहते आहेत, जे त्याची आतुरतेने पुन्हा पडद्यावर येणाची वाट पाहत होते. यातलीच एक मोठी फॅन म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडे.
श्रेया बुगडे ही शाहरुख खानची खूप मोठी चाहती असून ती नेहमीच त्याला फॉलो करत असते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या श्रेयाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मात्र श्रेया स्वतः शाहरुखची मोठी फॅन आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा सिनेमा पाहायला ती चित्रपटगृहात गेली होती. यावेळी तिने तिचा एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो आणि त्याचे कॅप्शन सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
श्रेयाने चित्रपटगृहांमध्ये शाहरुखच्या पोस्टरला किस केले आणि याचा एक फोटो तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “‘तू फक्त माझाच…’. तिचा हा फोटो आणि हे कॅप्शन सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असून यावर तिच्या मित्रांसह फॅन्स देखील कमेंट्स करत आहे.
View this post on Instagram
तत्पूर्वी पठाण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचा दुष्काळ संपवला असून सिनेमाने केवळ सहा दिवसांमध्येच जगभरात ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दमदार कमबॅक केले असून, तो खरा किंग असल्याचे देखील सिद्ध केले आहे. अनेक वादांनंतरही या सिनेमाने बक्कळ पैसा कमावला आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा, डिंपल कपाडिया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून, सलमान खानने यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
चुरा लिया है तुमने जो दिल को…! रवीना टंडनचा प्रमेता पाडणारा लूक, पाहाच फोटो
चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा अपमान करायचा सलमान खान? खुद्द कबीर खान यांनीच केला खुलासा