Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लग्न करायचं नाही आणि केलं तर फक्त प्रेम…,’ अंकुर वाढवेची पोस्ट चर्चेत

‘चला हवा या येऊ द्या’ कार्यक्रमाने अल्पावधीत खूप लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमातील कलाकार ही खूप लोकप्रिय झाले आहे. या कलाकारांनी आपल्या विनोदीशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हे कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यामुळे या कार्यक्रमाला लोकांनी डोक्यावर घेतेले आहे. हे कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे अंकुर वाढवे.

अंकुर वाढवे (ankur vadhve) याने महाराष्ट्रातील प्रत्येक चाहत्यांच्या मनामनात घरं केलं आहे. शरीराने उंची कमी असली तरी त्याने समोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना तो सामोरे गेला. अंकुर वाढवे हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने वैयक्तिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

या पोस्टमध्ये त्याने लग्नसंस्थेवर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पोस्ट मध्ये त्याने लिहिले की, ‘आयुष्यात कधीही प्रियासी भेटली नाही एक भेटली पण आंतरजातीय म्हणून लग्नासाठी तिने नकार दिला. यानंतर मी निर्णय घेतला कधीही लग्न करायचं नाही आणि केलं तर फक्त प्रेम विवाह.

पुढे तो म्हणतो की, कारण माझं असं म्हणणं होतं की, अरेंज मॅरेजमध्ये कदाचीत मुली आई बाबांच्या दबावाखाली हो म्हणतात आणि प्रेम विवाहासाठी मला कोणी स्वीकारणार नाही, हेही तेवढंच सत्य. कारण प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला राजकुमार ठरलेला असतो. त्यात मी बसत नाही म्हणून ठरवलं होत लग्न न करणच ठीक आहे.

त्यानंतर तो म्हणतो की, ‘निकिताच स्थळ आले आणि तिला न बोलता न भेटता हो बोललो. त्याच कारणं अस की ती माझ्या मामाची मुलगी. तिला काही गोष्टी माहित होत्या माझ्याबद्दल. फायनल होण्या आधी एक कॉल केला तिला माझ्या सगळ्या सवई आणि पहिली आणि शेवटची प्रेयसीबद्दल ही स्पष्ट बोललो, तरीही ती हो बोलली. मला जशी हवी होती तशीच प्रेयसी भेटली. मित्र आहेत असतील पण किमान आतापर्यंत तरी मी तुला आणि तू मला कधीच अंधारात ठेवत नाही. कदाचीत हे प्रेमविवाहामध्ये मिळालं नसतं. माझं तुझ्यावर कायम प्रेम राहील.’ (chala hawa yeu dya fem actor ankur vadhve share instagram post about marriage & lovestory)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याने लग्नाची मागणी घालताच ‘मृणाल ठाकूर’ चे भन्नाट उत्तर म्हणाली….,’
‘सातारचा सलमान’ या चित्रपटासाठी संपुर्ण गावाला दिला रंग; हेमंत ढोमेंनी सांगितला मजेदार किस्सा

हे देखील वाचा