Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

असे काय घडले की, निलेश साबळे आणि टीमला मागावी लागली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माफी

महाराष्ट्राचा सर्वात लाडका आणि लोकप्रिय शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम ओळखला जातो. संपूर्ण राज्याला खळखळून हसवणाऱ्या या शोमध्ये प्रत्येक भागात काहीतरी खास आणि हटके पाहायला मिळते. या शोची लोकप्रियता बघता हिंदीमधील देखील मोठमोठे कलाकार इथे हजेरी लावतात. प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या वेगवेगळ्या सेलेब्रिटींमुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. पण आता हा शो आणि यात दिसणारे कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आले आहे.

झाले असे की, या शोचा दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या निलेश साबळेने राजकीय नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांची माफी मागितली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सादर झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामात काही राजकीय नेत्यांची विडंबनं दाखवण्यात आली होती. यामध्ये नारायण राणे यांच्याही विडंबनचा समावेश होता. या भागातून नारायण राणे यांचे जे पात्र दाखवले गेले, त्यामुळे त्यांचा अपमान झाल्याचा आरोप राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि शोकडून त्यांची माफी मागितली जावी ही मागणी केली. सादर वाद जास्त वाढून चिघळू नये यासाठी, निलेश साबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नारायण राणे यांची भेट घेत माफी मागितली.

यावेळी निलेश साबळेने सांगितले की, “नारायण राणे हे ‘चला हवा येऊ द्या’ चे रसिक प्रेक्षक असून त्यांनी नेहमीच कलाकारांचा सन्मान केला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा आणि माझ्या टीमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही.”

निलेश साबळे आणि त्याच्या कार्यक्रमातील सहकाऱ्यांनी मिळून नारायण राणेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आणि राणे यांची नमस्कार करून माफी मागितली. शोचा विवादित भाग प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या पात्रावर नारायण राणे यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. या पत्रामुळे नारायण राणे समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि निलेश साबळेला फोन करून संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण जास्त वाढू नये म्हणून निलेश साबळे आणि त्याच्या टीमने नारायण राणे यांची भेट घेत त्यांची माफी मागितली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा