अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांची नवी ओटीटी फिल्म ‘चीकाटिलो’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होत असलेल्या या तमिळ क्राइम थ्रिलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. X या प्लॅटफॉर्मवर अनेक नेटिझन्स चित्रपटाबाबत आपली मतं व्यक्त करत आहेत.
‘चीकाटिलो’ या चित्रपटाचे प्रमोशन एका दमदार महिला प्रधान मर्डर मिस्ट्री म्हणून करण्यात आले होते. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील तांत्रिक बाबी, सिनेमॅटोग्राफी आणि शोभिता धुलिपालाची प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यांचे कौतुक केले आहे. मात्र, काही प्रेक्षकांना वाटते की चित्रपटाची कथा अपेक्षेप्रमाणे थरारक ठरत नाही आणि जॉनरनुसार जी तीव्रता असायला हवी, ती कमी पडते.
सोशल मीडियावर एका युजरने लिहिले आहे, “हा फारसा प्रभावी चित्रपट नाही. राइटिंग कमकुवत आहे आणि क्लायमॅक्समधील ट्विस्ट फारसा परिणाम साधू शकला नाही. मात्र, अभिनय आणि सिनेमॅटोग्राफी नक्कीच उत्तम आहे.”
एका दुसऱ्या युजरने चित्रपटाला “टाइमपास क्राइम थ्रिलर” असे संबोधत, जेवताना पाहण्यासारखा चित्रपट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका युजरने म्हटले, “कथेत काहीही नवीन नाही. २-३ सीन ठीकठाक आहेत, पण इन्व्हेस्टिगेशन आणि क्लायमॅक्स अधिक प्रभावी असू शकला असता.”
दुसरीकडे, काही प्रेक्षकांनी शोभिता धुलिपालाच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “संध्या नेल्लुरीच्या भूमिकेत शोभिता कमाल दिसते. तिच्या अभिनयामुळे संपूर्ण चित्रपट पाहण्यासारखा वाटतो. महिला प्रधान क्राइम थ्रिलर आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहता येईल.”
काहींनी मात्र चित्रपटावर तीव्र टीकाही केली आहे. एका युजरने ‘चीकाटिलो’ला ५ पैकी १ रेटिंग देत, “कमी सस्पेन्स, जास्त मेलोड्रामा आणि अंदाज येणारा क्लायमॅक्स” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘चीकाटिलो’ ही एक स्लो-बर्न मिस्ट्री फिल्म असून, त्यात शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala)संध्या नावाच्या टीव्ही रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. रोजच्या बातम्या कव्हर करून कंटाळलेली संध्या आपल्या मित्र बॉबीसोबत एक पॉडकास्ट सुरू करते आणि न सुटलेले गुन्हे उलगडू लागते. मात्र, बॉबीचा निर्घृण खून झाल्यानंतर संध्या एका भयावह तपासात अडकते.
या चित्रपटाला इंडिया टीव्हीने ५ पैकी ३ स्टार रेटिंग दिली असून, ‘चीकाटिलो’ हा चित्रपट पाहावा की नाही, हे प्रेक्षकांच्या आवडीवर अवलंबून आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
वडिलांच्या जाण्यानंतर सनी देओल बनले आईचा आधार; व्हायरल व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं










